-
काँग्रेस नेते राहुल गांधी लडाख दौऱ्यावर आहेत.
-
शनिवारी ( १९ ऑगस्ट ) सकाळी राहुल गांधी रायडरच्या लूकमध्ये दिसले. राहुल गांधी यांनी पँग्नॉग सरोवरापर्यंत बाइक चालवली आहे. राहुल गांधींच्या अधिकृत अकाउंटवरून हे फोटो शेअर करण्यात आले आहेत.
-
यात राहुल गांधी स्वत:हा बाइक चालवताना दिसत आहेत. या फोटोवर कॅप्शन लिहिलं की, “पँग्नॉग सरोवर हे जगातील सर्वांत सुंदर ठिकाणांपैकी एक असल्याचं माझे वडील म्हणायचे.”
-
मिळालेल्या माहितीनुसार, राहुल गांधी माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची जयंती पँग्नॉग सरोवर येथे साजरी करणार आहेत.
-
राहुल गांधींनी ५०० हून अधिक युवकांशी शुक्रवारी संवाद साधला, अशी माहिती लेह काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांनी दिली.
-
कलम ३७० आणि ३५ ( अ ) रद्द केल्यानंतर आणि जम्मू-काश्मीर वेगळे झाले. नवी केंद्र शासित प्रदेशाची निर्मिती झाल्यानंतर राहुल गांधींचा हा पहिलाच लडाख दौरा आहे.

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”