-
चांद्रयान-३ वरुन टिपलेली चंद्राच्या पृष्ठभागाची चार छायाचित्रे भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्त्रो) सोमवारी प्रसिद्ध केली.
-
यांचे वैशिष्ट्य म्हणजे चंद्राचा हा पृष्ठभाग पृथ्वीवरुन पाहता किंवा अभ्यासता येत नाही.
-
चंद्राच्या परिवलन आणि परिभ्रमण कक्षेमुळे हा भाग कायम मागच्या बाजुला असतो.
-
‘इस्त्रो’च्या अहमदाबाद येथील ‘अंतराळ अॅप्लिकेशन्स केंद्रा’मध्ये तयार झालेल्या ‘लँडर हॅझार्ड डिटेक्शन अँड अॅवायडन्स’ कॅमेऱ्याने (एलएचडीएसी) ही छायाचित्रे टिपली आहेत.
-
भारताची ‘चांद्रयान-२’ ही मोहीम चार वर्षांपूर्वी थोडक्यात अयशस्वी ठरली होती.
-
मात्र ‘चांद्रयान-२’चा ऑर्बिटर चंद्राच्या कक्षेत आहे.
-
त्यामध्ये आणि ‘चांद्रयान-३’च्या विक्रम लँडरमध्ये संपर्क प्रस्थापित झाला आहे.
-
या दोघांमध्ये माहितीचे संप्रेषण सुरु झाले आहे, असे इस्त्रोकडून सांगण्यात आले.
-
‘चांद्रयान-२’च्या ऑर्बिटरशी संपर्क झाल्याने चंद्राच्या पृष्ठभागापर्यंत पोहोचण्यासाठी आणखी मार्ग आहेत, असे इस्त्रोने सांगितले.
-
‘चांद्रयान-३’चे लँडर मॉड्यूल बुधवारी संध्याकाळी ६.०४ वाजता चंद्राच्या पृष्ठभागावर उतरणार आहे.
-
त्याचे थेट प्रक्षेपण त्या दिवशी संध्याकाळी ५.२० वाजता सुरु होईल.
-
ऑर्बिटर, लँडर आणि रोव्हर यांचा समावेश असलेले ‘चांद्रयान-२’ २०१९ मध्ये प्रक्षेपित करण्यात आले होते.
-
पोटात रोव्हर असलेले लँडर चंद्राच्या पृष्ठभागावर आदळले आणि अलगद अवतरण करण्यात अयशस्वी झाले होते.
-
(सर्व फोटो सौजन्य : भारतीय अंतराळ संशोधन संस्था / ट्विटर)

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”