-
भारताच्या चांद्रयान-३ ने चंद्रावर यशस्वी लँडिंग करून इतिहास रचला आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर अवकाशयान उतरवणारा भारत आता पहिला देश बनला आहे. (पीटीआय फोटो)
-
त्याचबरोबर चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करणारा भारत हा रशिया, अमेरिका आणि चीननंतर जगातील चौथा देश ठरला आहे. (पीटीआय फोटो)
-
23 ऑगस्ट हा दिवस प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा दिवस आहे, कारण याच दिवशी भारताने चंद्रावर पाऊल ठेवत जगाला आपली ताकद दाखवून दिली आहे. (पीटीआय फोटो)
-
23 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 6 वाजून 40 मिनिटांनी ‘चांद्रयान 3’ ने चंद्रावर पाऊल ठेवले तेव्हा प्रत्येक भारतीयाच्या डोळ्यात आनंदाश्रू होते आणि प्रत्येकाची छाती अभिमानाने फुलली होती. (एपी फोटो)
-
यावेळी संपूर्ण देशात जल्लोषाचे वातावरण होते. राजकारणी आणि बॉलीवूड सेलिब्रिटींपासून ते सर्वसामान्यांपर्यंत प्रत्येकाने धुमधडाक्यात आनंद साजरा केला. (एपी फोटो)
-
चांद्रयान 3 चंद्रावर उतरल्यानंतर देशाच्या कानाकोपऱ्यातील भारतीयांनी कसा आनंद व्यक्त केला हे आपण पाहू शकतो. (पीटीआय फोटो)
-
चांद्रयान 3चे चंद्रावर सॉफ्ट लँडिंग व्हावे यासाठी लोकांनी देवाकडे प्रार्थना केली होती. आता या यशानंतर भारतीयांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. (फोटो: सुनीत सिंग/ट्विटर)
-
चंद्रावर चांद्रयान-३ उतरतानाचे थेट प्रक्षेपण पाहून भारतीयांनी टाळ्या वाजवत ‘भारत माता की जय’चा जयघोष करत आनंद व्यक्त केला. (फोटो: रॉयटर्स)
-
लखनऊमध्ये चंद्राच्या पृष्ठभागावर ‘चांद्रयान -3’ चे यशस्वी लँडिंग झाल्यानंतर मदरशाचे विद्यार्थी आनंद साजरा करत होते. (पीटीआय फोटो)
-
इस्रोचे कर्मचारी बेंगळुरूमध्ये चांद्रयान-३ च्या यशस्वी लँडिंगचा आनंद साजरा करताना. (एपी फोटो)
-
रांचीमध्ये चंद्राच्या पृष्ठभागावर ‘चांद्रयान-3’ चे यशस्वी लँडिंग झाल्यानंतर एक शाळकरी मुलगी आनंदाने नाचताना. (पीटीआय फोटो)
-
चंद्रावर अंतराळयान चांद्रयान-3 चे यशस्वी लँडिंग झाल्याचा आनंद साजरा करताना भारतीय सुरक्षा दलाचे जवान. (एपी फोटो)
-
भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) चे अध्यक्ष एस. सोमनाथ आणि त्यांच्या अधिकाऱ्यांनी चंद्रावर चांद्रयान-३ चे यशस्वी लँडिंग झाल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. (एपी फोटो)
-
चांद्रयान-३ चे यशस्वी लँडिंग झाल्यानंतर शास्त्रज्ञांनी इस्रो मुख्यालयाच्या नियंत्रण कक्षात आनंदोत्सव साजरा केला. (पीटीआय फोटो)
-
चांद्रयान-३ चंद्रावर उतरल्यानंतर शास्त्रज्ञ टाळ्या वाजवत आनंद साजरा करताना दिसले. (पीटीआय फोटो)
-
चांद्रयान 3च्या सॉफ्ट लँडिंगनंतर नवी दिल्ली येथे सीएसआयआरच्या मुख्यालयात केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांच्यासह सीएसआयआरचे महासंचालक एन.के. कलैसेल्वी आणि इतरांनी आनंद साजरा केला. (पीटीआय फोटो)
-
केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी सीएसआयआरच्या मुख्यालयात चंद्राच्या पृष्ठभागावर यशस्वी सॉफ्ट लँडिंग केल्यानंतर चंद्रयान-3 च्या लँडरच्या प्रतिकृतीला नमन केले. (पीटीआय फोटो)
-
नागपूरमधील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी चंद्राच्या पृष्ठभागावर ‘चांद्रयान-3’ च्या यशस्वी लँडिंगचा आनंद साजरा केला. (पीटीआय फोटो)
-
पटणामध्ये लोकांनी फटाके फोडून तिरंगा फडकावून आनंद व्यक्त केला. (पीटीआय फोटो)
-
दिल्लीतील इंडिया गेटवर लोकांनी तिरंगा फडकावून आनंद व्यक्त केला. (पीटीआय फोटो)
-
गुरुग्राममधील शालेय विद्यार्थी आनंद साजरा करताना. (पीटीआय फोटो)

२३ फेब्रुवारी पंचांग: मेष, कन्या राशीचा रविवार जाणार आनंदात; तुमच्या नशिबात कोणत्या मार्गे येणार सुख? वाचा राशिभविष्य