-
शिवाजी महाराजांचं राज्य हे रयतेचं स्वराज्य होतं. राजर्षी शाहू महाराजांनी भोंदूगिरीचा पुरस्कार कधी केला नव्हता, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे. ते राष्ट्रवादीच्या कोल्हापुरातील स्वाभिमान सभेत बोलत होते.
-
“माझी आई कोल्हापूरची होती. कोल्हापूरच्या मातेच्या पोटी जन्माला यायचं भाग्य मिळालं,” असेही शरद पवारांनी म्हटलं.
-
“एका गोष्टीचा आनंद आहे. सगळं जग आपल्या नजरा लावून चांद्रयान-३ उतरणार हे पाहत होतं. ते उतरलं एक ऐतिहासिक काम देशातील तज्ज्ञांनी करुन दाखवलं. इस्त्रोची स्थापना करण्याची भूमिका जवाहरलाल नेहरु यांनी केली,” असं शरद पवारांनी सांगितलं.
-
“एका बाजूनं ही स्थिती असताना दुसऱ्या बाजूला चित्र काय आहे. लोक महागाईनं त्रासलेले आहेत. लोक बेकारीनं त्रासलेले आहेत,” असं शरद पवार म्हणाले.
-
“यवतमाळ जिल्हात १८ दिवसात २४ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. शेतीमालाला भाव मिळत नाही, कर्ज फेडायची इच्छा आहे, पण ताकद नाही, त्याची भांडीकुंडी बाहेर काढली जातात त्यामुळं शेतकरी टोकाला जातो,” असं शरद पवारांनी सांगितलं.
-
“गेल्या सहा दिवसांपासून आपण रोज वाचतोय कांद्याची काय स्थिती आहे, कांदा उत्पादक शेतकऱ्यांना घामाची किंमत पाहिजे. कांद्याचा उत्पादन खर्च त्याच्या पदरात पडला पाहिजे. त्यासाठी कांदा जगात पाठवला पाहिजे. कांदा भारताच्या बाहेर जात असताना कांद्यावर ४० टक्के कर लावला आहे. यामुळे देशातल्या कांद्याला जगात ग्राहक मिळेना,” असं म्हणत शरद पवारांनी मोदी सरकारला लक्ष्य केलं.
-
“एकनाथ शिंदेंनी म्हटलं, ‘शरद पवार कृषीमंत्री असताना कांद्यासाठी केलं?’ मी कृषीमंत्री असताना कांद्यावर कधी कर लावला नाही. कांदा विदेशात जाईल, याची काळजी घेतली,” असा प्रत्युत्तर शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांना दिलं.
-
“कोल्हापूर हे शूरांचं शहर आहे. कोल्हापुराला शौर्याचा इतिहास आहे. त्यामुळे इथं ईडीची नोटीस आली, तर लोक सामोरं जायची ताकद दाखवतील, असं मला वाटलं होतं. पण, कोल्हापुरात कोणाला तरी नोटीस आली. मला वाटलं होतं, आमच्याबरोबर काम केलेले लोकं काहीतरी स्वाभिमानी असतील,” असं म्हणत शरद पवारांनी हसन मुश्रीफांवर हल्लाबोल केला.
-
“यांच्या घरातील महिलांनी धाडी टाकण्यापेक्षा गोळ्या घाला असं म्हटलं. एखादी भगिनी असं बोलू शकते. पण, कुटुंबाच्या प्रमुखाने असं काही बोलल्याचं मी ऐकलं नाही. घरातल्या महिलांसारखं धाडस दाखवण्याऐवजी त्यांना वाटलं आपण ईडीच्या दरवाजात किंवा भाजपात जाऊ, मग यातून आपली सुटका करून घेऊ, अशी भूमिका त्यांनी घेतली,” अशी टीका शरद पवारांनी हसन मुश्रीफांवर केली आहे.

मासिक पाळी आलेल्या विद्यार्थीनीबरोबर शाळेचं क्रूर कृत्य, आईने व्हिडिओ रेकॉर्ड केल्यामुळे सत्य आलं समोर; चौकशीचे आदेश