-
ज्या निष्ठावंत सैनिकांनी गेली अनेक वर्षे पक्षासाठी रक्त सांडले, त्यांना नाराज करायचे नाही म्हणून आतापर्यंत मनसेशी युती केली नाही, असं स्पष्टीकरण शिवसेना ( ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिलं आहे. माजी नगरसेवकांच्या बैठकीत उद्धव ठाकरे बोलत होते.
-
उद्धव ठाकरे म्हणाले, “राज्यात भाजपबरोबर आपण तडजोड (पॅचअप) करू शकलो असतो, पण ते आपल्या नीतिमत्तेत बसणारे नाही.”
-
“मी मुख्यमंत्री असताना फुटलेल्या सर्व आमदारांना एका खोलीत डांबून ठेवू शकलो असतो, पण ते अगोदरच मनाने फुटले होते. त्यांना खोलीत डांबून ठेवण्यात काय अर्थ होता,” असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं.
-
“जुने निष्ठावंत जेव्हा पक्ष सोडून जातात तेव्हा खूप वाईट वाटते,” अशी खंत उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली.
-
“तुमच्यापैकी कोणाला आजही पक्ष सोडून जावेसे वाटत असेल तर खुशाल जा,” असा इशाराही उद्धव ठाकरे यांनी नगरसेवकांना दिला.
-
“मंत्री संजय राठोड आणि भावना गवळी यांना धूळ चारण्यासाठी कार्यकर्त्यांनी लोकसभा-विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागावे,” अशा सूचना उद्धव ठाकरे यांनी लोकसभा मतदारसंघाच्या आढावा बैठकीत दिल्या.

‘आयुष्यात एका सेंकदाचं महत्त्व काय?’ कुल्लू मनालीतला व्हायरल होणारा ‘हा’ VIDEO बघून झोप उडेल