-
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर जोरदार शाब्दिक हल्ला चढवला आहे.
-
ते बुधवारी (३० ऑगस्ट) मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी ते नेमकं काय म्हणाले याचा हा आढावा…
-
मोदी-शाहांच्या, उद्योगपती धनिकांच्या सरकारनं मुंबईची सर्व सुत्रे ठरल्याप्रमाणे दिल्लीकडे घेतली आणि त्यांचा खरा चेहरा उघड झाला – संजय राऊत
-
हे बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेने होऊ दिलं नसतं. त्यामुळे शिवसेना फोडण्यात आली – संजय राऊत
-
एक अत्यंत बुळचट, लाचार आणि गुलामी पद्धतीचा मुख्यमंत्री सत्तेवर बसवला आणि त्यांना मुंबईबाबत हवं ते करून घेतलं – संजय राऊत
-
या मुख्यमंत्र्यामध्ये आणि त्यांच्या सरकारमध्ये मराठी म्हणून अंशभर जरी स्वाभिमान शिल्लक असेल, तर ते राजीनामा देतील आणि सरकारला जाब विचारतील – संजय राऊत
-
१०५ हुताम्यांच्या बलिदानातून ही मुंबई महाराष्ट्राला मिळाली आहे – संजय राऊत
-
मुंबई महाराष्ट्रात राहावी, मुंबईतील मराठी माणसाला स्वाभिमानाने जगता यावं यासाठी ५५ वर्षांपूर्वी बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना स्थापन केली – संजय राऊत
-
आज त्या स्वाभिमानावर मोदी-शाहांच्या सरकारने बुलडोजर फिरवण्याचं काम केलं – संजय राऊत
-
हे मिंधे सरकार बुळचट सरकार महाराष्ट्राचा आणि मुंबईचा अपमान उघड्या डोळ्यांनी पाहतं आहे – संजय राऊत
-
सध्याच्या केंद्र सरकारला मुंबईवर ताबा हवा आहे – संजय राऊत
-
त्यांना मुंबईच्या संपत्तीवर ताबा हवा आहे, त्यांना मुंबई गिळायची आहे, मुंबई विकायची आहे, मुंबई लुटायची आहे – संजय राऊत
-
मुंबई महाराष्ट्राची राजधानी राहू नये आणि राहिली तरी त्या मुंबईवर महाराष्ट्राचं, मराठी माणसाचं नियंत्रण राहू नये यासाठी मागील १० वर्षे मोदी-शाहांचं सरकार काम करत आहे – संजय राऊत
-
मोदी शाहांनी सुरुवातीला मुंबईला कमकुवत केलं – संजय राऊत
-
मुंबईतील अनेक व्यवसाय, उद्योग, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय कार्यालयं, गुजरातमध्ये खेचून नेली – संजय राऊत
-
मुंबईच्या आर्थिक नाड्या आवळल्या. त्यांनी मुंबईतील मराठी माणसाला कंगाल करण्याचं कारस्थान रचलं – संजय राऊत
-
आता शेवटी मुंबईचा विकास मुंबई महानगरपालिका, महाराष्ट्र सरकार करणार नाही. त्यासाठी निवडणुका होऊ दिल्या जात नाहीत – संजय राऊत
-
सर्व छायाचित्र – संग्रहित
महाशिवरात्रीला कुंभ राशीत दुर्मिळ त्रिग्रही योग निर्माण झाल्यामुळे ४ राशी जगतील राजासारखे जीवन! तिजोरीत मावणार नाही धन