-
माझगाव डॉक शिप बिल्डर्समध्ये (एमडीएल) बांधणी करण्यात आलेल्या ‘महेंद्रगिरी’ या युद्धनौकेचे जलावतरण उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या पत्नी डॉ. सुदेश धनखड यांच्या हस्ते शुक्रवारी करण्यात आले.
-
‘महेंद्रगिरी’ ही भारतीय नौदलाच्या प्रकल्प १७ ए अंतर्गत सातवी आणि एमडीएलकडून बांधण्यात आलेली चौथी विनाशिका आहे.
-
कार्यक्रमाला राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते.
-
तसेच कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे, नौदलप्रमुख अॅडमिरल आर. हरि कुमार आणि ‘एमडीएल’चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक संजीव सिंघल यांच्यासह संरक्षण मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी, भारतीय नौदल आणि ‘एमडीएल’चे कर्मचारी उपस्थित होते.
-
देशातील आजवरच्या सर्वांत कमी वेळेत तयार झालेल्या फ्रिगेट श्रेणीतील आयएनएस ‘महेंद्रगिरी’ ही युद्धनौका आहे.
-
‘महेंद्रगिरी’ या निलगिरी श्रेणीतील सातव्या विनाशिकेचे जलावतरण म्हणजे भारतीय नौदलाच्या अचल वचनबद्धतेचा आणि असामान्य निर्धाराचा दाखला असल्याचे उपराष्ट्रपतींनी सांगितले.
-
निलगिरी श्रेणीतील विनाशिकांमध्ये बसवण्यात आलेली ७५ टक्के उपकरणे आणि प्रणाली लघु आणि मध्यम उद्योजकांकडून खरेदी करण्यात आली आहेत.
-
ही बाब प्रशंसनीय आहे.
-
अलीकडच्या काळात भारताची उल्लेखनीय आर्थिक प्रगती आणि जागतिक पातळीवरील उंचावलेले स्थान यामुळे भारताच्या सागरी हितसंबंधांचे रक्षण करण्यासाठी आधुनिक नौदलाची गरज असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
-
(सर्व फोटो सौजन्य : उपराष्ट्रपती जगदीप धनखड आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे / ट्विटर)

हनुमान जयंतीनंतर ४ ग्रहांची होणार महायुती; ‘या’ राशींचा वाईट काळ संपणार? शनिदेवाच्या कृपेने मिळू शकतो पैसाच पैसा