-
शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी जालन्यात मराठा आक्रोश मोर्चातील आंदोलकांवर झालेल्या लाठीहल्ला प्रकरणी मोठं विधान केलं आहे.
-
संजय राऊतांनी लाठीमार करण्यात आला त्या दिवशी आलेल्या अदृश्य फोनचा उल्लेख करत शिंदे-फडणवीस-पवार सरकारवर गंभीर आरोप केले.
-
ते रविवारी (३ सप्टेंबर) मुंबईत पत्रकारांशी बोलताना नेमकं काय म्हणाले याचा हा आढावा….
-
सरकार वैफल्यग्रस्त झालं आहे. सरकार मराठा समाजाच्या आंदोलकांना तोंड देऊ शकत नाही – संजय राऊत
-
त्यांनी एका बाजूला चर्चा केली आणि दुसऱ्या बाजूला लाठीहल्ला केला. हा काय प्रकार आहे – संजय राऊत
-
ज्या दिवशी संध्याकाळी हा लाठीहल्ला सुरू झाला त्यावेळी मुंबईत इंडिया गटाची जोरदार बैठकही सुरू होती – संजय राऊत
-
महाराष्ट्रासह देशातील संपूर्ण माध्यमे उद्धव ठाकरे काय बोलतात, राहुल गांधी काय बोलतात याकडे लक्ष देऊन होते – संजय राऊत
-
ही बैठक देशभरात दाखवली जात होती – संजय राऊत
-
त्यावरील माध्यमांचं लक्ष विचलित करण्यासाठी या लाठीहल्ल्याचे आदेश दिले का? – संजय राऊत
-
मराठा समाजाने आतापर्यंत इतके मोर्चे काढले. ते सर्व मोर्चे शांतपणे, शिस्तबद्धपणे काढले – संजय राऊत
-
त्यांनी लाखो लाखोंचे मूक मोर्चे काढले. कधीही त्यांच्याकडून बेशिस्तपणा घडला नाही – संजय राऊत
-
आधीच्या मोर्चांमध्ये आंदोलकांसह पोलिसांनीही या संयम राखला – संजय राऊत
-
हे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतानाही घडलं आहे. तेव्हा पोलिसांनी लाठी उगारली नाही – संजय राऊत
-
मराठा समाजातील आंदोलकांनी संयम सोडला नाही – संजय राऊत
-
मग काल अचानक जालन्यात हे का घडलं? – संजय राऊत
-
याची सरकार सखोल चौकशी करणार आहे, तर मग तो अदृश्य फोन कुणाचा होता इथपासून चौकशी करा – संजय राऊत
-
मी परत सांगतो, मुंबईत शिवसेनेने यजमानपद भुषवलेल्या देशभरातील विरोधी पक्षांची आघाडी ‘इंडिया’च्या बैठकीला गालबोट लागावं म्हणून हा लाठीहल्ला केला – संजय राऊत
-
त्यासाठी मराठा तरुणांचे, महिलांचे, वृद्धांचे, मुलांचे बळी घेण्याचा प्रयत्न करण्यात आला – संजय राऊत
Chhaava : ‘छावा’ने मोडला ‘बाहुबली २’चा रेकॉर्ड, सर्वाधिक कमाई करणारा भारतातील सहावा चित्रपट!