-
मराठा आंदोलनातील नेते मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीवर शिंदे-फडणवीस-पवार सरकारसह सर्वच पक्षांना ठणकावलं आहे.
-
ते सोमवारी (११ सप्टेंबर) जालन्यात पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलत होते. त्याचा उपोषणाचा १४ वा दिवस होता.
-
मनोज जरांगे यावेळी नेमकं काय म्हणाले त्याचा हा आढावा…
-
माझ्यावरचा उपचार म्हणजे मराठा आरक्षण आहे – मनोज जरांगे
-
आज महाराष्ट्रात सर्वपक्षीय बैठक लागली आहे. त्या बैठकीत सर्वांनी मिळून माझ्या वेदनेवर उपचार करावा – मनोज जरांगे
-
माझ्या मराठा समाजाच्या आरक्षणाच्या ज्या वेदना आहेत त्याच वेदना माझ्याही आहेत – मनोज जरांगे
-
माझा उपचार म्हणजे मराठा आरक्षण – मनोज जरांगे
-
माझी जात मला प्रिय आहे. माझा समाज मला प्रिय आहे – मनोज जरांगे
-
माझ्या समाजातील लेकरांना आरक्षण हवं आहे. ते उपचार मला गरजेचे आहेत. माझ्यावर उपचार काय करता – मनोज जरांगे
-
आतापर्यंत मराठा समाजाने सर्व पक्षांना भरभरून दिलं. आता त्यांचा नंबर आहे, मराठा समाजातील लेकरांना भरभरून देण्याचा – मनोज जरांगे
-
सगळा महाराष्ट्र बघतो आहे. बघुयात आता कोणता पक्ष आम्हाला भरभरून साथ देतो – मनोज जरांगे
-
महाराष्ट्रातील मराठा आता जागा झाला आहे. आम्हीही बघतो आहे की, कोणता कोणता पक्ष आमच्याबरोबर किती ताकदीने उभा राहतो – मनोज जरांगे
-
आम्ही लई दिलं, आता त्यांची वेळ आहे. आता कोण कुणावर अन्याय करतं हे लक्षात येईल – मनोज जरांगे
-
आम्ही ७५ वर्षे कुणावरच अन्याय केला नाही. आता ते इतरांना सांभाळण्यासाठी आमच्यावर किती अन्याय करतात हे दिसेल – मनोज जरांगे
-
इतरांवर अन्याय होऊ नये म्हणून ते आमच्यावर किती अन्याय करतात हे आज लक्षात येईल – मनोज जरांगे (सर्व छायाचित्र – संग्रहित, लोकसत्ता ग्राफिक्स टीम))
होळीच्या दोन दिवसानंतर ‘या’ तीन राशींना मिळणार जबरदस्त धन लाभ, चंद्र-शुक्राच्या कृपेने मिळेल अपार श्रीमंती