-
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी इंग्लडचे पंतप्रधान ऋषी सुनक यांचं नाव घेत शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
-
यूटी असा उल्लेख करत ते लंडनला येतात, मोठमोठ्या संपत्ती घेतात आणि थंडगार हवा खातात असं ऋषी सुनक यांनी सांगितल्याचा दावा एकनाथ शिंदेंनी केला.
-
तसेच पाटणकर काढा घेण्याची वेळे येईल, असं म्हणत उद्धव ठाकरेंना सूचक इशारा दिला. ते शासन आपल्या दारी कार्यक्रमात नेमकं काय म्हणाले याचा हा आढावा…
-
आपला देश महासत्तेकडे चालला आहे. आज आपल्या देशाचं नाव लोक अभिमानाने घेऊ लागले आहेत, मग यांना पोटदुखी का असावी – एकनाथ शिंदे
-
काही करार केले त्यामुळे आपल्या देशात मोठ्या प्रमाणात उद्योग येतील. आपल्याला नोकऱ्या मिळतील, स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी काम मिळेल – एकनाथ शिंदे
-
मग याची पोटदुखी का? उलट याचं स्वागत करायला पाहिजे – एकनाथ शिंदे
-
यांचं सरकार गेल्यावर त्यांना विश्वास नाही की, सरकार गेलंय की, राहिलं. त्यांच्या मनावरचा ताबा गेलाय – एकनाथ शिंदे
-
त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. म्हणून ते काहीही बोलू लागले आहेत – एकनाथ शिंदे
-
मी ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांना भेटलो. ते आपल्या भारतातील जुने नागरिक – एकनाथ शिंदे
-
त्यांना महाराष्ट्राचा मुख्यमंत्री भेटला आणि मलाही आपला माणूस इंग्लंडचा पंतप्रधान झाला याचा अभिमान होता – एकनाथ शिंदे
-
काही लोकांनी त्यावर टीका केली. काय भेटले, कसे भेटले, काय बोलले, कुठल्या भाषेत बोलले याला काय अर्थ आहे – एकनाथ शिंदे
-
मी त्यावर बोलणार नव्हतो, पण त्यांनी विचारलं म्हणून मी मुद्दाम सांगतो – एकनाथ शिंदे
-
ऋषी सुनक यांनी मला विचारलं की, यूटी कसे आहेत. त्यावर मी विचारलं का? तर ते म्हणाले की, ते दरवर्षी लंडनला येतात – एकनाथ शिंदे
-
मोठ्यामोठ्या संपत्ती घेतात, थंडगार हवा खातात. त्यांची खूप माहिती माझ्याकडे आहे – एकनाथ शिंदे
-
तुम्ही एकदा लंडनला आलात की, मी सगळं सांगतो – एकनाथ शिंदे
-
हे बोलताना शिंदेंनी उपस्थितांना यूटी म्हणजे काय हे तुम्हाला माहिती आहे असं विचारलं. त्यावर उपस्थितांनी उद्धव ठाकरे असं म्हटलं. यानंतर एकनाथ शिंदेंनी हे मत व्यक्त केलं.
-
मी एवढंच सांगतो की, आम्हाला सगळं माहिती आहे. आमच्यावर बोलण्याची वेळ येऊ देऊ नका – एकनाथ शिंदे
-
अन्यथा पाटणकर काढा घेण्याची वेळ येईल – एकनाथ शिंदे (लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
S. Jaishankar : अमेरिकेने भारतीय नागरिकांना बेड्या का घातल्या होत्या? परराष्ट्रमंत्री म्हणाले, “टॉयलेट ब्रेकवेळी…”