-
शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते व विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांसह शिंदे-फडणवीस सरकारवर सडकून टीका केली.
-
ते शनिवारी (२४ सप्टेंबर) नवी मुंबईत गणपती बाप्पांचं दर्शन घेण्यासाठी आले असताना पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना नेमकं काय बोलले याचा हा आढावा…
-
रात्री बेरात्री बैठका घेणारे गद्दार लोक आहेत. त्यांच्याविषयी गणरायासमोर जास्त बोलू नये – अंबादास दानवे
-
गणराया योग्यप्रकारे सोंड फिरवेल आणि गद्दारांना धडा शिकवेल – अंबादास दानवे
-
६० टक्के लोकांची बँकेत खाती उघडली म्हणजे मोदींनी स्वतःच्या पैशाने ही खाती उघडली का? – अंबादास दानवे
-
जनतेने स्वतःच्या पैशातून ही जनधन खाती उघडली आहेत – अंबादास दानवे
-
आज जनधन खात्याची स्थिती काय आहे. हा पैसा कोण वापरतो आहे. या खात्याचा जनतेला फायदा काय – अंबादास दानवे
-
खातं उघडलं म्हणजे त्यांनी चंद्रावर फार मोठे दिवे लावले की काय – अंबादास दानवे
-
उलट त्यांनी जनतेला या खात्यावर १५ लाख रुपये टाकू. या आश्वासनाचं काय झालं याचं उत्तर अमित शाहांनी द्यावं. होते त्याचे काय झाले? – अंबादास दानवे
-
पर्यावरणाच्या रक्षणासाठी असे देखावे साकारणे गरजेचे आहे. मुंबई नवी मुंबईतील पर्यावरण हा मोठा प्रश्न आहे – अंबादास दानवे
-
नवी मुंबईतील अनेक डोंगर लोकांनी खोदले. त्यामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडला. पर्यावरण जपण्याची गरज आहे – अंबादास दानवे
-
सर्व छायाचित्र – संग्रहित

रीलसाठी थेट रेल्वे रुळावर झोपली! तेवढ्यात भरधाव वेगात ट्रेन आली अन्…, VIDEO पाहून बसेल धक्का