-
गेल्या काही दिवसांपासून सातत्याने भाजपा नेत्या पंकजा मुंडे पक्षात नाराज असल्याची चर्चा होत असते.
-
अशातच काही दिवसांपूर्वी पंकजा मुंडेंनी अमित शाहांना भेटून आपल्या मनातील सर्व गोष्टी सांगणार असल्याचं वक्तव्य केलं होतं.
-
याबाबत आता त्यांना विचारलं असता पंकजा मुंडेंनी अजून तरी अमित शाहांकडून वेळच मिळाला नसल्याचं म्हटलं. त्या टीव्ही ९ मराठीला दिलेल्या मुलाखतीत नेमकं काय म्हणाल्या त्याचा हा आढावा…
-
मी अमित शाहांना भेटून माझ्या मनात जे आहे ते सांगणार असं म्हटले होते – पंकजा मुंडे
-
मात्र, अजून तरी मला अमित शाहांची वेळ मिळाली नाही – पंकजा मुंडे
-
ते व्यग्र होते. मध्यंतरी लोकसभा अधिवेशन सुरू होतं – पंकजा मुंडे
-
मात्र, मला वेळ का मिळाली नाही याचं उत्तर मी कसं देणार, पण त्यांची वेळ मिळालेली नाही. कारण ते विधेयकांमध्ये व्यग्र होते – पंकजा मुंडे
-
आता तर निवडणुका वगैरे आहेत. ते जेव्हा वेळ देतील तेव्हा मी त्यांना भेटेन – पंकजा मुंडे
-
मी त्यांना सांगितलं आहे की, हे माझे लोक आहेत आणि ते अस्वस्थत आहेत – पंकजा मुंडे
-
मात्र हे मी आत्ताची राजकीय गणितं तयार होण्याआधी सांगितलं होतं – पंकजा मुंडे
-
आता तर आणखी वेगळं झालं आहे. आता सत्तेत आणखी एक भागिदार निर्माण झाला आहे – पंकजा मुंडे
-
तेव्हाच्या आणि आत्ताच्या परिस्थितीत परत फरक पडला आहे – पंकजा मुंडे
-
त्यामुळे मी त्यांच्याकडे वेळ मागितली आहे. आता ते जेव्हा वेळ देतील तेव्हा मी त्यांच्याशी बोलेन – पंकजा मुंडे
-
गोपीनाथ मुंडेंना जो संघर्ष करावा लागला तोच संघर्ष मला करावा लागत नाहीये. मला गोपीनाथ मुंडेंपेक्षा जास्त संघर्ष करावा लागत आहे – पंकजा मुंडे
-
कारण गोपीनाथ मुंडेंच्यावेळी संघर्षाची एक पातळी होती. तो वैचारिक संघर्ष होता – पंकजा मुंडे
-
दोन गटांमध्ये किंवा दोन विचारांमध्ये तडजोड झाली नाही, विचार एक झाले नाही, तर कुठंतरी ऐकण्याची जागा होती. आता तशी परिस्थिती नाही. त्यामुळे माझा संघर्ष जास्त आहे – पंकजा मुंडे
-
हा संघर्ष केवळ पक्षातला नाही, तर कार्यकारणीचा, आर्थिक अडचणींचा विषय आहे. त्या काळात झालेल्या गोष्टींचा हा विषय आहे – पंकजा मुंडे
-
मी १०० कोटी रुपयांचं कर्ज घेतलं आणि दुसरीकडे वापरलं असं नाही. हे २००९-२०१२ या गोपीनाथ मुंडेंच्या काळातील कर्ज आहे. हा कर्जाचा, मतदारसंघातील संघर्षाचा विषय आहे – पंकजा मुंडे
-
गोपीनाथ मुंडेंना त्यांच्या घरच्यांविरोधात लढावं लागलं नाही. मात्र, मला त्यांच्या आदेशामुळे लढावं लागलं. हा एक संघर्ष होता – पंकजा मुंडे
-
मंत्रिपदाच्यावेळी समोर विरोधी पक्षनेते माझाच भाऊ होता. आता आम्ही त्यातून बाहेर आलो आहोत. त्यानंतर समाजाच्या निर्णयांचा संघर्ष होता – पंकजा मुंडे
-
उदाहरणार्थ दसरा. या सर्व संघर्षांना गोपीनाथ मुंडे सामोरे गेले नाहीत, मी गेले. जशी वारसाने एखादी गोष्ट सहज मिळते, तशी ती टिकवण्यासाठी त्या व्यक्तीपेक्षाही दहापट संघर्ष करावा लागतो – पंकजा मुंडे (सर्व छायाचित्र – पंकजा मुंडे फेसबूक)

अर्रर्र… मारुतीचा ग्राहकांना धक्का! १ एप्रिलपासून कंपनीची ‘ही’ कार कायमची होणार बंद, कारण काय?