-
शिवसेनेच्या ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर वेळकाढूपणा करत असल्याचा आरोप केला.
-
यावेळी अनिल परब यांनी नार्वेकर वेळकाढूपणासाठी डावपेच करत असल्याचा आरोप केला आणि तो डावपेच सांगितला. ते नेमकं काय म्हणाले याचा आढावा खालीलप्रमाणे…
-
सर्वोच्च न्यायालयाने १६ आमदारांचं प्रकरण एकत्र ऐकलं – अनिल परब
-
दुसरीकडे सर्वोच्च न्यायालयाच्या खाली असलेलं विधानसभा अध्यक्षांचं हे न्यायालय प्रत्येक आमदाराची याचिका वेगवेगळी ऐकण्याच्या मनस्थितीत आहे – अनिल परब
-
त्याबाबत निर्णय झालेला नाही. मात्र, असं करून वेळकाढूपणाचं धोरण आहे – अनिल परब
-
व्यवस्थित बघितलं तर लक्षात येईल की, २३ नोव्हेंबरपर्यंत त्यांनी तारखा कळवल्या आहेत. २३ नोव्हेंबरनंतर उलट तपासणी सुरू होणार आहे – अनिल परब
-
उलट तपासणी कुणाची, कशासाठी, किती काळ चालणार याविषयी काहीही म्हटलं नाही – अनिल परब
-
उलट तपासणी संपल्यावर दोन आठवड्यांनी ते निकाल देणार आहेत – अनिल परब
-
कदाचित ते उलट तपासणी चार महिने चालवतील. साक्ष चार महिने चालवतील – अनिल परब
-
सुनावणी आठवड्यातून दोनदाच घ्यायची आहे. ४० लोकांची सुनावणी घ्यायची आहे – अनिल परब
-
त्यात वेळ वाढवून मागितला जाईल आणि वेगवेगळे डावपेच टाकून हे प्रकरण लांबवण्याचे प्रयत्न चालू आहेत – अनिल परब
-
सर्वोच्च न्यायालयाने १० महिने सर्व प्रकरण सविस्तरपणे ऐकलं आणि त्याप्रमाणे आपले निष्कर्ष काढून आमदार अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांकडे पाठवला – अनिल परब
-
सगळ्यांचा गुन्हा सारखा आहे. त्यामुळे वेगवेगळी सुनावणी घेण्याची गरज नाही – अनिल परब
-
राज्यपालांनी केलेली कृती हे मान्य केलेलं तथ्य आहे – अनिल परब
-
सर्वांना हे मान्य असताना राज्यपालांना साक्षीला बोलावणार आहेत का? – अनिल परब
-
मुख्यमंत्र्यांनी शपथ घेतली हे सर्वमान्य तथ्य आहे – अनिल परब
-
आता मुख्यमंत्र्यांना शपथविधीला बोलावणार का? – अनिल परब
-
व्हिप मिळाला हे त्यांनी मान्य केलंय. तसेच आम्हाला तुमचा व्हिप लागूच होत नाही, असं त्यांचं म्हणणं आहे – अनिल परब
-
ते गुवाहटीला गेले, सुरतला गेले, तिकडे त्यांनी बैठका घेतल्या. त्या बैठकांचं त्यांनी इतिवृत्त पाठवलं – अनिल परब
-
हेही मान्यताप्राप्त तथ्य आहे. त्यामुळे या सर्व मान्य असलेल्या तथ्यांमध्ये वेळ घालवण्याची गरजच नाही – अनिल परब
-
विधानसभेचे अध्यक्ष हे कुठल्याही पक्षाचे राजकीय कार्यकर्ते नाहीत – अनिल परब
-
ते आता न्यायिक संस्था म्हणून सुनावणी घेणार आहेत – अनिल परब
-
त्यामुळे त्यांनी न्यायिक संस्था म्हणून काम करावं आणि एक महिन्यात हे प्रकरण संपवावं, अशी आमची विनंती आहे – अनिल परब
-
३ ऑक्टोबरला यावर सुनावणी होईल. त्यावेळी आमचे वकील या सर्व गोष्टी तिकडेही मांडतील – अनिल परब (सर्व छायाचित्र – अनिल परब फेसबूक)

Kunal Kamra Controversy : “मी जिथे राहत नाही तेथे जाणं म्हणजे…”; कुणाल कामराची सूचक पोस्ट, मुंबई पोलिसांना डिवचलं?