-
लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी आलेल्या लाखो पुणेकरांच्या उपस्थितीत मानाचे पाच गणपतींचे ढोल-ताश्यांच्या गजरात विसर्जन करण्यात आले.
-
सकाळी १० वाजून १५ मिनिटांनी पुण्याचे ग्रामदैवत आणि मानाचा पहिला कसबा गणपती पारंपरिक पद्धतीने पालखीमध्ये मिरवणूक काढण्यात आली.
-
पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि विधान परिषदेच्या उपसभापती निलमताई गोऱ्हे यांच्या हस्ते पुजा करून मिरवणुकीला सुरुवात झाली.
-
दरम्यान चार वाजण्याच्या सुमारास पावसाने हजेरी लावली.
-
यानंतर गणरायांच्या भक्तीत लीन होत आणि जोरदार पावसात पुणेकर नागरिकांनी गणरायांला निरोप दिला.
-
गतवर्षी प्रमाणे यंदाही सायंकाळी सातच्या आत मानाच्या पाच गणपतींचे विसर्जन करण्यात आले.
-
मानाचा पहिला कसबा गणपतीची मिरवणूक सकाळी १०:१५ वाजता सुरू झाली, तर दुपारी ४:३५ वाजता विसर्जन झाले.
-
मानाचा दुसरा तांबडी जोगेश्वरी गणपतीची मिरवणूक सकाळी ११ वाजता सुरू झाली, तर सायंकाळी ५:१० वाजता विसर्जन झाले
-
मानाचा तिसरा गुरुजी तालीम गणपतीची मिरवणूक दुपारी १२ वाजता सुरू झाली आणि सायंकाळी ५:५५ वाजता विसर्जन झाले.
-
मानाचा चौथा तुळशीबाग गणपतीची मिरवणूक दुपारी १ वाजता सुरू झाली, तर सायंकाळी ६:३२ वाजता विसर्जन झाले.
-
मानाचा पाचवा केसरीवाडा गणपतीची मिरवणूक दुपारी २:१५ सुरू झाली, तर सायंकाळी ६:४५ वाजता विसर्जन झाले.
-
(छायाचित्र सौजन्य – एक्स्प्रेस फोटो – पवन खेंगरे/अरूल होरिझोन)
![WTC Points Table After Gabba Test Match Drawn What Will be India's World Test Championship Final Scenario](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2024/12/WTC-Points-Table-5.jpg?w=300&h=200&crop=1)
WTC Points Table: गाबा कसोटी ड्रॉ झाल्यानंतर WTC गुणतालिकेत भारत कितव्या स्थानी? कसं आहे भारताचं फायनलसाठी समीकरण?