-
शरद पवारांनी रविवारी (१ ऑक्टोबर) पुण्यातील जुन्नर येथे पत्रकार परिषदेत केलेल्या वक्तव्यांची जोरदार चर्चा आहे. ते नेमकं काय म्हणाले याचा हा आढावा…
-
मला छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाघ नख्यांबाबत काही ज्ञान नाही – शरद पवार
-
मात्र, इंद्रजीत सावंत हे मराठी भाषेतील इतिहासाचे जाणकार आहेत. त्यांचं शिवाजी महाराजांच्या वाघ नख्यांबाबत वेगळं मत आहे हे मी टीव्हीवर पाहिलं – शरद पवार
-
असं असलं तरी मला प्रत्यक्षात त्याबाबत माहिती नाही. तसेच त्याबाबत वाद निर्माण करावा असं मला वाटत नाही – शरद पवार
-
जे लोक भारतीय जनता पार्टीबरोबर आहेत ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असू शकत नाहीत – शरद पवार
-
आज कुणी भाजपाबरोबर जाण्याची भूमिका घेऊन तडजोड करण्याचा विचार करत असतील, तर तो विचार आम्ही स्वीकारणार नाही – शरद पवार
-
त्याचं कारण कालच्या निवडणुकीत, मग ती विधानसभा असो की लोकसभा, लोकांना भाजपाच्या विरोधात मतदान केलं आहे – शरद पवार
-
जनतेने भाजपाच्या विरोधात आम्हाला मतदान केलं असेल, तर आम्हाला त्याचा आदर करावा लागेल – शरद पवार
-
पक्षावर आपला दावा सिद्ध करण्यासाठी दोन तृतियांश पाठिंबा दाखवावा लागतो, असा कोणताही कायदा नाही – शरद पवार
-
मला निवडणूक आयोगाचं ६ ऑक्टोबरला हजर राहण्याचं समन्स आलं आहे – शरद पवार
-
मी सुनावणीसाठी जाणार आहे. यावेळी आमचे वकिलही हजर राहतील. तेथे आम्ही आमची भूमिका मांडू – शरद पवार
-
निवडणुकीला अजून वेळ आहे. त्यामुळे जुन्नरमधून आमचा उमेदवार कोण असणार आहे याबाबत बघू. माध्यमांनी त्याबाबत काळजी करू नये – शरद पवार
-
निवडणुकीत पुणे जिल्हा आणि जुन्नर तालुक्यातील लोकांचा माझा अनेक वर्षांचा अनुभव आहे – शरद पवार
-
ते सहसा माझ्या शब्दाला नकार देत नाहीत – शरद पवार
-
सर्व छायाचित्र – संग्रहित

Video : शेतकऱ्यांसाठी बेस्ट जुगाड! पोती उचलायला मजूर नाही? तर ही भन्नाट युक्ती वापरून पाहा, व्हिडीओ होतोय व्हायरल