-
आपली लढाई कुणाशी आहे, हे लक्षात घ्या. राहुल गांधी यांच्या नेतृत्वातील इंडिया आघाडी आपल्याशी लढा देऊ शकत नाही. कारण, राहुल गांधी आणि काँग्रेसबद्दल जनतेच्या मनात प्रतिष्ठा आणि विश्वासार्हता नाही, असा हल्लाबोल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
-
देवेंद्र फडणवीस म्हणाले, “राहुल गांधी, ममता बॅनर्जी, अखिलेश यादव, तेजस्वी यादव नेतृत्व करू शकत नाहीत, हे लोकांच्या मनात पक्क आहे. निवडणुकीपूर्वीच ही लोक भांडत आहेत. पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, दिल्ली, बिहारमध्ये काँग्रेसने निवडणूक लढू नये, असं मित्रपक्षांनी सांगितलं आहे.”
-
“हे निवडणुकीपूर्वीच एकत्र राहू शकत नाहीत. तर, निवडणुकीनंतर एकत्र येण्याचा संबध येतच नाही. यांच्यात कुणीही राष्ट्रीय नेता नाही. पंतप्रधान मोदी काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत कुठल्याही जिल्ह्यात गेल्यावर तेवढेच लोक स्वागताला आणि सभेला असतात.”
-
“पण, इंडिया आघाडीतील एकही जण दुसऱ्याला मत देऊ शकत नाहीत. कुणीही एका राज्याच्या बाहेर नेते नाहीत,” असा टोला देवेंद्र फडणवीसांनी लगावला आहे.
-
“इंडिया आघाडीचा मोदींना विरोध करणं हाच संकल्प आहे. पंतप्रधान मोदी पुन्हा निवडून आले, तर आपली घरगुती दुकानं बंद होतील, म्हणून हे सर्व एकत्र आले आहेत,” असं टीकास्र फडणवीसांनी सोडलं आहे.
-
“महाराष्ट्रात तीन पक्षांचं आपलं सरकार आहे. आपल्याबरोबर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस आहे. पण, तिघांमध्ये भाजपा हा मोठा भाऊ आहे. त्यामुळे मोठ्या भावाला त्यागही करावा लागतो,” असं फडणवीसांनी सांगितलं.
-
“मोठ्या भावाला दोन्ही भावांना सांभाळून घ्यावं लागतं. ही जबाबदारी आपल्याला पार पाडावी लागेल,” असेही फडणवीस म्हणाले.
-
“हे सरकार तीन पक्षांचं असलं, तरी भाजपा आपल्या ध्येयधोरणापासून हटणार नाही. भाजपा ध्येय आणि धोरणावर काम करत राहिल. दोन्ही मित्रपक्षांना बरोबर घेऊन निश्चितपणे काम करणार आहोत,” असे फडणवीसांनी म्हटलं.
-
“२०१४ आणि २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत आपण ४० च्या वरती जागा मिळवल्या होत्या. यंदाच्याही निवडणुकीत मेहनत केली, तर सर्व रेकॉर्ड तोडू शकतो,” असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
![famous actress Parvati Nair got engaged to businessman Aashrith Ashok](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/famous-actress-Parvati-Nair-got-engaged-to-businessman-Aashrith-Ashok.jpg)
प्रसिद्ध अभिनेत्रीने बिझनेसमनशी केला साखरपुडा, आजपासून लग्नाआधीच्या सेलिब्रेशनला सुरुवात, ‘या’ शहरात होणार लग्न