-
शिवसेनेतील बंडखोरीनंतर शिंदे गट आणि ठाकरे गट वारंवार आमनेसामने आलेला पाहायला मिळत आहे.
-
शिवसेनेच्या शिंदे गटातील मंत्री दीपक केसरकरांनी दसरा मेळाव्याच्या माध्यमातून ठाकरे गट सहानुभुती मिळवण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप केला.
-
यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केसरकरांचा एकेरी उल्लेख करत सडकून टीका केली. ते नेमकं काय म्हणाले याचा हा आढावा…
-
कोण दीपक केसरकर? केसरकरांचा शिवसेनेशी काय संबंध आहे? – संजय राऊत
-
हा सावंतवाडीमधील मोती तलावावरचा डोमकावळा आहे – संजय राऊत
-
दीपक केसरकरांचा शिवसेनेशी काहीही संबंध नाही – संजय राऊत
-
त्यांना ना इकडल्या शिवसेनेशी काही संबंध आहे, ना तिकडल्या शिवसेनेशी काही संबंध आहे – संजय राऊत
-
हा माणूस पदासाठी, सत्तेसाठी शिवसेनेत आला – संजय राऊत
-
त्यांना उद्धव ठाकरेंनी मंत्री केलं. त्याला आमचा विरोध होता – संजय राऊत
-
हे बाहेरचे लोक घेऊ नका असं आमचं म्हणणं होतं. कारण हे पाठीत खंजीर खुपसून पळून जातील – संजय राऊत
-
दीपक केसरकरांना अर्थमंत्री, गृहराज्यमंत्री, दोनदा आमदार केलं. आता हे आम्हाला शिकवत आहेत का? – संजय राऊत
-
हे एकनाथ शिंदेंच्या पाठीत खंजीर खुपसून भाजपात जातील – संजय राऊत (सर्व छायाचित्र – संग्रहित)

Ravindra Dhangekar: रवींद्र धंगेकरांनी शिवसेनेत प्रवेश करताच एकनाथ शिंदे म्हणाले, “आता कळेल हू इज धंगेकर…”