-
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील बुधवारी (११ ऑक्टोबर) मुंबईत पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसमोर बोलताना अचानक आमदार जितेंद्र आव्हाड आले आणि जयंत पाटलांच्या कानात बोलले.
-
यानंतर जयंत पाटील यांनी मिश्किलपणे “माझ्यावर मागून दबाव आला आहे”, असं म्हटलं. तेव्हा नेमकं काय झालं, जयंत पाटील काय म्हणाले याचा हा आढावा…
-
आज निवडणूक आयोगाच्या दारात आमची लढाई सुरू आहे. त्या सुनावणीत शरद पवारांच्या कार्यशैलीवर भाष्य केलं जात आहे – जयंत पाटील
-
२५ वर्षे शरद पवारांच्याच कार्यशैलीमुळे यांना पदं मिळाली, हे मंत्री झाले, वेगवेगळ्या पदांवर पोहचले – जयंत पाटील
-
आज २५ वर्षानंतर त्यांच्याच कार्यशैलीवर प्रश्न उपस्थित करता, मग २५ वर्षे तुम्हाला त्यांच्या कार्यशैलीमुळे संधी मिळाली त्याचं काय? – जयंत पाटील
-
शरद पवार हुकुमशाह आहेत, असा आरोप केला जात आहे – जयंत पाटील
-
मात्र, या कार्यक्रमात इतका वेळ ते बसले आहेत, एकदाही ते तू बोलू नकोस, तूच बोल, कुणीच बोलायचं नाही, आता मीच एकटा बोलणार असं काही बोलले नाहीत – जयंत पाटील
-
शरद पवार हुकुमशाहीने, मनमानी करून पक्ष चालवतात असा आरोप केला जात आहे – जयंत पाटील
-
मात्र, माझ्यासह इथं बसलेल्या कुणालाही तो अनुभव नाही. एकटा जालना जिल्ह्यातील निर्णय घ्यायचा असेल, तरी शरद पवारांनी राजेश टोपे आणि त्या जिल्ह्याच्या अध्यक्षासह कार्यकर्त्यांशी चर्चा केल्याशिवाय प्रमुख निर्णय कधीच घेतला नाही – जयंत पाटील
-
सगळ्यांना विश्वासात घेणं म्हणजेच शरद पवार आहेत – जयंत पाटील
-
आता त्याच शरद पवारांच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत – जयंत पाटील
-
मात्र, ज्या दिवशी आम्ही त्यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न विचारायला लागू त्यावेळी अवघड होईल – जयंत पाटील
-
देशातील लोकशाही टिकवण्यासाठी कितीही किंमत मोजावी लागली तरी ती मोजेन. मात्र, मी लोकशाही टिकवण्याच्या बाजूने उभा राहील, हे शरद पवारांनी त्यांच्या कृतीतून सिद्ध केलं आहे – जयंत पाटील
-
त्या शरद पवारांवर लोकशाही मुल्ये मानत नाहीत असे आरोप केले जात आहेत. म्हणून माझी विनंती आहे की, कार्यकर्त्यांनी पूर्ण ताकदीने कामाला लागा – जयंत पाटील
-
यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी हळूच जयंत पाटलांच्या कानात काहीतरी सांगितलं. यानंतर जयंत पाटलांनी मिश्किलपणे माझ्यावर मागून दबाव आला आहे, असं म्हटलं. तसेच आपलं भाषण उरकतं घेतलं. (सर्व छायाचित्र – संग्रहित)
Mahashivratri 2025 Wishes : “हर हर महादेव!”, प्रियजनांना पाठवा महाशिवरात्रीच्या खास मराठमोळ्या अन् हटके शुभेच्छा, पाहा एकापेक्षा एक सुंदर संदेश