-
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी रविवारी (१५ ऑक्टोबर) पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसमोर भाषण केलं.
-
यावेळी त्यांनी पक्षातील बंडखोरांपासून एकदिवसीय विश्वचषक २०२३ मधील भारत-पाकिस्तान सामन्यापर्यंत भाष्य केलं. ते काय म्हणाले याचा हा आढावा…
-
मी दोन तीन दिवसांपूर्वी वर्तमानपत्रात वाचलं की, कधी काळी आपल्याबरोबर काम करणाऱ्या आणि आता वेगळा रस्ता स्विकारलेल्या लोकांनीही त्यांच्या अध्यक्षाची निवड केली – शरद पवार
-
फरक एवढाच आहे की, तुम्ही ज्यांची निवड केली ते कधीच तुरुंगात गेलेले नव्हते. दुसऱ्या बाजूचे कुठे गेले होते हे मला माहिती नाही. मात्र, तुम्हाला तो सर्व इतिहास माहिती आहे – शरद पवार
-
आजची पक्षाची ही बैठक नवा रस्ता दाखवणारी, आत्मविश्वास देणारी आहे. याचा मला आनंद आहे – शरद पवार
-
सध्या इथं आपण जयंत पाटलांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीचं काम करतो आहे. मात्र, काही मित्रांनी आपल्याला दिल्लीच्या कोर्टात नेलं आहे – शरद पवार
-
आपल्यावर दोन ठिकाणी खटले दाखल आहेत. एक खटला निवडणूक आयोगात आहे. तेथे सांगण्यात येतंय की, हा पक्ष त्यांचाच आहे – शरद पवार
-
दुसरा खटला सर्वोच्च न्यायालयात दाखल आहे. या दोन्ही ठिकाणी तुमच्या खऱ्या राष्ट्रवादीला संघर्ष करण्याचा प्रसंग आपल्या जुन्या सहकाऱ्यांनी आणला – शरद पवार
-
मला खात्री आहे की, आज ना उद्या निकाल लागेल त्यावेळी सामान्य माणसाच्या अंतःकरणात बसलेली खरी राष्ट्रवादी कोण याचा निकाल आपल्या बाजूने होईल आणि चित्र बदलेल – शरद पवार
-
आपल्या पक्षाच्या वतीने ही कोर्ट कचेरी चालू आहे. त्यात निष्णात वकील काम करत आहेत – शरद पवार
-
जितेंद्र आव्हाड आणि सुप्रिया सुळे या सर्व कोर्टाच्या कामात माहिती घेण्यासाठी उपस्थित असतात. तसेच वकिलांना लागणारी मदत देत असतो – शरद पवार
-
यामुळे दिवसेंदिवस आपलं म्हणणं सत्यावर आधारित आहे हे लोकांसमोर येईल, याची मला खात्री आहे – शरद पवार
-
काल भारत विरुद्ध पाकिस्तानचा सामना बघितला आणि अतिशय चांगला सामना झाला – शरद पवार
-
भारताचा विजय झाला. त्या विजयात मुंबईच्या खेळाडूचं योगदान हे अधिक होतं – शरद पवार
-
म्हणून साहजिकच आपण सर्वजण त्या सामन्याबाबत आनंदी होतो – शरद पवार (सर्व छायाचित्र – संग्रहित)

Video : शेतकऱ्यांसाठी बेस्ट जुगाड! पोती उचलायला मजूर नाही? तर ही भन्नाट युक्ती वापरून पाहा, व्हिडीओ होतोय व्हायरल