-
उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ड्रग्ज तस्करी प्रकरणातील आरोपी ललित पाटील २०२० मध्ये त्याला अटक केली तेव्हा शिवसेनेचा नाशिक शहरप्रमुख होता, असा आरोप केला.
-
आता त्यावर शिवसेनेच्या ठाकरे गटातील खासदार संजय राऊत यांनी प्रत्युत्तर देत गृहमंत्री फडणवीस खोटं बोलत असल्याचा आरोप केला.
-
राऊतांनी दादा भुसेंनी ललित पाटीलला शिवसेना प्रवेश देण्याची विनंती करताना उद्धव ठाकरेंना काय म्हटलं होतं हे सांगितलं आहे.
-
संजय राऊत रविवारी (२२ ऑक्टोबर) मुंबईत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देताना बोलत होते. ते या प्रकरणात नेमकं काय म्हणाले त्याचा हा आढावा…
-
ड्रग्ज माफियांचं साम्राज्य या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या सरकारच्या आशिर्वादाने सुरू आहे – संजय राऊत
-
आता नाशिकचे आजी माजी पालकमंत्री, साताऱ्याचे एक मंत्री बोलत आहेत. मात्र, नांदगावपासून मालेगावपर्यंत हप्ते कसे जात होते ही सगळी माहिती पोलिसांकडे आली आहे – संजय राऊत
-
आता पोलिसांवर दबाव येईल. तसेच यांची नावं घ्या, त्यांची नावं घ्या असं सांगितलं जाईल – संजय राऊत
-
पोलिसांनी ज्या महात्म्याला पकडलं आहे त्याला आत्ताच्या मंत्र्यांचा पाठिंबा होता – संजय राऊत
-
त्याचा शिवसेनेशी काडीमात्र संबंध नाही – संजय राऊत
-
दादा भुसे सांगत आहेत की, उद्धव ठाकरेंनी ललित पाटीलला शिवबंधन बांधलं. मात्र, ललित पाटीलला उद्धव ठाकरेंकडे घेऊन कोण आलं होतं? – संजय राऊत
-
साहेब, हा आपला खास माणूस आहे. याला आपण शिवसेनेत प्रवेश देऊ. तुम्ही त्याला शिवबंधन बांधा. मी याला माझ्याबरोबर घेऊन महाराष्ट्रात फिरेन, असं सांगणारे कोण आहे – संजय राऊत
-
आम्हाला फार माहिती नसते, कुणीतरी एखाद्या जिल्ह्यातील कार्यकर्ता घेऊन येतो – संजय राऊत
-
दुसरीकडे भाजपाने तर त्यांना माहिती असलेले आरोपी बरोबर घेतले. अजित पवार, हसन मुश्रीफ, भावना गवळी, राहुल शेवाळे, एकनाथ शिंदे हे तर सर्वश्रुत आरोपी होते – संजय राऊत
-
ते माहिती असतानाही भाजपाने त्या आरोपींना बरोबर घेतलं आणि मंत्रिमंडळात बसवलं – संजय राऊत
-
ज्यांना तुरुंगात टाकलं पाहिजे ते भाजपाबरोबर मंत्रिमंडळात आहे – संजय राऊत
-
असं असताना ते आम्हाला कायदा सुव्यवस्था, संस्कार, संस्कृतीच्या गोष्टी सांगत आहेत. याची उत्तरं दसरा मेळाव्यात मिळतील – संजय राऊत
-
देवेंद्र फडणवीस खोटं बोला, पण रेटून बोला याला जागून वागत आहेत. कुणी तरी एक ड्रग्ज माफिया मुंबईत पकडला आहे आणि चेन्नईत, बंगळुरूत पकडल्याचं सांगत आहेत – संजय राऊत
-
हे म्हणतात की, तो शिवसेनेचा नाशिक शहर प्रमुख होता. आम्ही कोण कोण कधी कधी शहर प्रमुख होतं त्याची यादी दिली आहे – संजय राऊत
-
ललित पाटील साधा शिवसेनेचा उपशाखाप्रमुख किंवा गटप्रमुखही नव्हता – संजय राऊत
-
जे लोक फडणवीसांच्या मंत्रिमंडळात मांडीला मांडी लावून बसले आहेत तेच लोक त्याला पोसत होते. गृहमंत्री फडणवीस किती खोटं बोलत आहेत – संजय राऊत
-
एकतर फडणवीसांचं त्यांच्या गृहखात्यावर नियंत्रण नाही किंवा त्यांचा गुप्तचर विभाग त्यांना चुकीची माहिती देत आहे. इतका अपयशी गृहमंत्री महाराष्ट्राने पाहिला नव्हता – संजय राऊत
-
आता पोलिसांनी निष्पक्षपणे तपास करावा. सध्या मंत्रिमंडळातील जे सर्व पोपट बोलत आहेत ते घाबरून बोलत आहेत. यांना घाम फुटला आहे. म्हणून ते आरोप करत सुटले आहेत – संजय राऊत
-
नाशिकसह अनेक जिल्ह्यातील गुन्हेगारी कोण पोसत आहे, ड्रग्ज माफियापासून खुनी, चोर, दरोडेखोरांना कोण पोसतंय? – संजय राऊत
-
ज्यांच्यावर ईडी, सीबीआयचे खटले होते असेच लोक भाजपाबरोबर गेले, त्यांच्याबरोबर भाजपाने सरकार बनवलं. त्यामुळे भाजपाच गुंडांचा पोशिंदा आहे – संजय राऊत (,सर्व छायाचित्र – संग्रहित, लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
होळीनंतर या तीन राशींचे चमकणार सोन्यासारखे नशीब, बँक बॅलेन्समध्ये वाढणार, मिळेल अपार पैसा संपत्ती