-
विजयादशमीच्या मुहूर्तावर भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांचा बीडमधील सावरगाव येथे दसरा मेळावा पार पडला. यावेळी विविध विषयांवर पंकजा मुंडे यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केलं.
-
“छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रात मराठा, धनगर, माळी समाजाच्या लोकांनी माझं स्वागत केलं. या दसरा मेळाव्यात कार्यकर्त्यांनी गर्दीचं सीमोल्लंघन केलं.” – पंकजा मुंडे
-
“मी शिवशक्ती परिक्रमा केली. मला वाटत वाटलं नव्हतं, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात एवढं प्रेम मिळेल. शिवशक्ती परिक्रमा भव्य करण्याचं काम माझ्यावर आणि मुंडेंवर प्रेम करणाऱ्या जनतेनं केलं आहे. माझ्या कातड्याचे जोडे केले, तरी तुमचे उपकार फेडता येणार नाही.” – पंकजा मुंडे
-
“माझ्या कारखान्यावर छापेमारी झाल्यावर दोन दिवसांत तुम्ही ११ कोटी रूपये जमा केले. तुम्ही उन्हात बसलात, म्हणून स्टेजवरील सुद्धा उन्हात आणि मी सुद्धा उन्हात आहे.” – पंकजा मुंडे
-
“मी लोकांचे पैसे घेतले नाहीत. माझ्या लोकांचे आशीर्वाद पुरेसे आहेत. तुम्ही जमा केलेले पैसे मी घेणार नाही, मी माझ्या मुलाला सांगितलं. मी तुम्हाला फक्त स्वाभिमान देऊ शकते. माझा माणूस उन्हात असेल, तर सत्तेच्या खुर्चीवर सावलीत जाऊन बसणाऱ्यांचं रक्त गोपीनाथ मुंडेंचं असूच शकत नाही.” – पंकजा मुंडे
-
“जिंकण्यासाठी तुम्ही निष्ठा गहाण ठेवू शकत नाही. राजकारणात लोकांचे हित बघणे माझे परम कर्तव्य आहे. जनतेला न्याय दिल्याशिवाय पुढच्या दसरा मेळाव्याला तोंड दाखवणार नाही.” – पंकजा मुंडे
-
“निवडणुकीत माझा पराभव झाला असला, तरी तुमची मान खाली जाईल, असं काम मी करणार नाही.”- पंकजा मुंडे
-
“महाराष्ट्रात मराठा आणि ओबीसी आरक्षणाबाबत प्रश्न सरकारकडून खूप अपेक्षा आहेत. या अपेक्षा भंग होणं जनतेला सहन होणार नाही.” – पंकजा मुंडे
-
“ज्यांना पद, प्रतिष्ठा आणि मान मिळतो त्यांचं भागतं. दरवेळी तुम्ही आशा लावता आणि दरवेळी तुमचा अपेक्षा भंग होतो. पद न घेता निष्ठा काय असते, या लोकांना विचारा. जिंकण्यासाठी निष्ठा, नितीमत्ता गहाण ठेवू शकत नाही. आता माझ्या माणसांना त्रास होऊ देणार नाही. आपल्याला त्रास देणाऱ्यांचं घर उन्हात बांधू. ज्या ठिकाणी तुमचं भलं त्याचं ठिकाणी पंकजा नतमस्तक होणार.” – पंकजा मुंडे
२३ फेब्रुवारी पंचांग: मेष, कन्या राशीचा रविवार जाणार आनंदात; तुमच्या नशिबात कोणत्या मार्गे येणार सुख? वाचा राशिभविष्य