-
मराठा समाजातील काही तरुणांनी वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या घराबाहेर उभ्या असलेल्या त्यांच्या गाड्यांची तोडफोड केली.
-
या तोडफोडीनंतर गुणरत्न सदावर्ते यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली. ते नेमकं काय म्हणाले याचा हा आढावा…
-
मला अनेक प्रकारच्या धमक्या दिल्या जात होत्या. माझी मुलगी झेन मागील ८ दिवसांपासून शाळेत जात नाही. कारण झेन आणि जयश्री पाटील यांना मारण्याच्या आणि उचलून नेण्यापर्यंतच्या धमक्या आहेत – गुणरत्न सदावर्ते
-
सामान्यांच्या ५० टक्के जागा वाचवत असल्याने आम्हाला त्रास दिला जाईल, आमच्यावर हल्ले होतील, अशा धमक्या स्पष्टपणे दिल्या जात होत्या – गुणरत्न सदावर्ते
-
मी जेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटलो तेव्हा त्यांनी स्वतः माझ्यासमोर संयुक्त पोलीस आयुक्तांना फोन कॉल केला होता – गुणरत्न सदावर्ते
-
त्यानंतरही कॅबिनेट मंत्र्यांना माझ्यासमोर डीसीपी चिमटे यांना फोन कॉल केला होता – गुणरत्न सदावर्ते
-
हे सांगण्याचं कारण म्हणजे माझ्यावर हल्ला होईल याबाबत पोलिसांनाही माहिती होती – गुणरत्न सदावर्ते
-
त्यांनी पोलिसांच्या समक्ष हल्ला केला, गाड्यांची तोडफोड केली. ते माझ्या घरातही येण्याचा प्रयत्न करत होते, असंही पोलिसांनी मला सांगितलं – गुणरत्न सदावर्ते
-
मला हिंदुराष्ट्र भारतातील सर्वांना सांगायचं आहे की, आता वेळ आली आहे – गुणरत्न सदावर्ते
-
या जातीपाती करून या देशातील विचाराचे आणि गुणवत्तेचे तुकडे केले जाऊ शकतात – गुणरत्न सदावर्ते
-
हे तुकडे होऊ नये, गुणवंत सुरक्षित राहावेत म्हणून मी लढा देईन – गुणरत्न सदावर्ते
-
माझी हत्या झाली तरी रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत मी गुणवतांसाठीचा लढा चालू ठेवीन – गुणरत्न सदावर्ते (सर्व छायाचित्र – संग्रहित)

भागवत एकादशी, २६ मार्च पंचांग: मेष ते मीनपैकी कोणाला लाभेल आज विठ्ठलाची कृपा; तुमचे नशीब कसे बदलणार? वाचा राशिभविष्य