-
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा बेमुदत उपोषण सुरू केलं.
-
सरकारने मागितल्याप्रमाणे ४० दिवसांचा वेळ देऊनही मराठा आरक्षणावर निर्णय न झाल्याने जरांगेंनी हा निर्णय घेतला.
-
आज (२९ ऑक्टोबर) उपोषणाच्या पाचव्या दिवशी मनोज जरांगे यांची प्रकृती काहिशी खालावली. यावेळी त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली. ते नेमके काय म्हणाले त्याचा हा आढावा…
-
लढाई करायची असेल, तर क्षत्रियांनी घाबरायचं नसतं, रडायचं नसतं – मनोज जरांगे
-
आपण क्षत्रीय आहोत. तुमचं पोरगं गेलं, तर बिनधास्त कुंकू पुसायचं, रडायचं नाही. तो क्षत्रियाचा धर्म आहे – मनोज जरांगे
-
लढताना मरण आलं, तर मागे सरकायचं नाही. क्षत्रियांनी रडायचं नसतं, लढायचं असतं – मनोज जरांगे
-
महाराष्ट्रातील मराठ्यांना मला सांगायचं आहे की, आरक्षण मिळाल्याशिवाय तुमचं हे पोरगं हटणार नाही – मनोज जरांगे
-
काळजी करू नका, फक्त तुम्ही शांततेत आंदोलन करा. काहीही झालं तरी मी हटत नाही – मनोज जरांगे
-
आता दोनच पर्याय आहेत. एक तर सरकारने आरक्षण द्यायचं, नाही तर मराठ्यांशी सामना करायचा, तोही शांततेत – मनोज जरांगे
-
यापेक्षा वेगळा पर्यायच राहिलेला नाही. देशातील सर्व मराठा समाज उभा राहणार आहे. सरकारला थोड्याच दिवसात हे कळेल – मनोज जरांगे
-
माझी विनंती आहे की, आपल्या आंदोलनाचा दुसरा टप्पा चालू आहे. पहिल्या टप्प्यात २५ ते २८ ऑक्टोबर या चार दिवसांचं साखळी उपोषण झालं – मनोज जरांगे
-
२९ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबर आमरण उपोषणाचा दुसरा टप्पा चालू आहे. हा टप्पा शांततेत चालू आहे, शांततेत चालू राहील. गडबड करू नका, आरक्षण मिळणार आहे – मनोज जरांगे
-
माझ्या जीवाचं काही बरंवाईट झालं, तर मराठा समाज आंदोलन करेन – मनोज जरांगे
-
माझं हृदय बंद पडलं तर सरकारचंही ह्रदय बंद पडेल हे त्यांनी लक्षात ठेवावं आणि मराठा समाजाला तातडीने आरक्षण द्यावं – मनोज जरांगे
-
सर्व छायाचित्र – संग्रहित व लोकसत्ता ग्राफिक्स टीम
IND vs PAK: “अरे ए…”, रोहित शर्माचा मेसेज आणि विराटने चौकारासह शतक केलं पूर्ण; शतकानंतर कोहलीने दिली अशी प्रतिक्रिया…पाहा VIDEO