-
मराठा आरक्षणासाठी बेमुदत उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगेंनी आंदोलन चिघळण्यावर आणि व्हायरल मेसेजमुळे निर्माण झालेल्या संभ्रमावर भाष्य केलं.
-
बुधवारी (१ नोव्हेंबर) उपोषणाच्या आठव्या दिवशी मनोज जरांगे यांनी नेमक काय म्हटलं याचा हा आढावा…
-
आंदोलन चिघळवण्यात सरकारची भूमिका आहे का? तुम्हाला आंदोलनस्थळावरून उठवण्याचं षडयंत्र आहे का? असा प्रश्न मनोज जरांगेंना विचारण्यात आला.
-
सरकार मला आंदोलनस्थळावरून उठवू शकत नाहीत. त्यांचा याच्यात १०० टक्के डाव दिसत आहे – मनोज जरांगे पाटील
-
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांचाही त्यात सहभाग आहे – मनोज जरांगे पाटील
-
हे आंदोलन फार मोठं झालं आहे. मराठा समाजाला आरक्षण दिल्याशिवाय आम्ही आंदोलनस्थळावरून उठणार नाही – मनोज जरांगे पाटील
-
आमच्याकडून उद्रेक होणार नाही, कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही. आमचं आंदोलन शांततेत चालू आहे, शांततेतच चालू राहणार आहे – मनोज जरांगे पाटील
-
मेसेज व्हायरल करून संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न, काय आवाहन कराल?” या प्रश्नावर मनोज जरांगेंनी प्रतिक्रिया दिली.
-
मराठा समाजाचे तरुण शांततेत आंदोलन करत आहेत. हा संभ्रम सरकारी पक्षाचेच लोक निर्माण करत असावेत – मनोज जरांगे पाटील
-
बीड, केजचे साखळी उपोषणाला बसलेल्या आमच्या लोकांना पोलिसांनी विनाकारण उचलून नेलं – मनोज जरांगे पाटील
-
यावरून हे कळतं की, प्रशासन सरकारच्या पुढेपुढे करत आहे – मनोज जरांगे पाटील
-
हिंसाचार करणारे बाजूला राहिले आणि शांततेत आंदोलन करणाऱ्यांचं साखळी उपोषण बंद केलं जात आहे – मनोज जरांगे पाटील
-
जर त्यांना सोडलं नाही, तर बीडचे पोलीस अधीक्षक मराठा आंदोलकांवर कसे अन्याय करतात ते मी पाहतो – मनोज जरांगे पाटील
-
असं असलं तरी त्या कार्यकर्त्यांना सोडून देण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री कार्यालयाकडून मिळाली आहे – मनोज जरांगे पाटील
-
जर तातडीने अधिवेशन घेण्यावर व मराठा आरक्षण देण्यावर आज निर्णय घेतला नाही, तर मी आज संध्याकाळपासून पाणी सोडणार आहे – मनोज जरांगे पाटील (सर्व छायाचित्र – संग्रहित, लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”