-
Mukesh Ambani Death Threat Email: उद्योगपती मुकेश अंबानी यांना जीवे मारण्याची धमकी देणारे ईमेल पाठवण्याच्या प्रकरणात राजवीर खंत या २१ वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली आहे. राजवीर हा पोलिसांचाच पुत्र असल्याचे वृत्त फ्री प्रेस जर्नलने दिले आहे
-
मुंबई गुन्हे शाखेने उघड केले की, राजवीरने पाकिस्तानी क्रिकेटर शादाब खानच्या नावाने एक ईमेल आयडी तयार केला होता ज्यावरून त्याने अंबानींना धमकीचा मेल पाठवला होता
-
राजवीरचे वडील हे गुजरात पोलिस दलात हवालदार पदावर कार्यरत आहेत. त्याला शनिवारी गांधीनगरमधील कलोल येथून अटक करण्यात आली
-
पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात विश्वचषक क्रिकेट सामना सुरू असताना त्याने shadabkhan@mailfence हा आयडी तयार केला. त्यावेळी खान फलंदाजी करत होता आणि त्याने ४६ धावा केल्या होत्या, सामना पाहताना त्याला खंडणीच्या मेलची कल्पना सुचली
-
राजवीर खंत हा बीकॉमचा तृतीय वर्षाचा विद्यार्थी आहे. खंतने अंबानींना पाच धमकीचे ईमेल पाठवले. पहिल्या ईमेलमध्ये त्याने २० कोटी रुपयांची मागणी केली, दुसऱ्या ईमेलमध्ये ही मागणी २०० कोटी रुपये आणि नंतर ४०० कोटी रुपये इतकी वाढली होती
-
अंबानींना मेल करणारा दुसरा आरोपी, गणेश रमेश वनपर्धी हा १९ वर्षीय कॉम्प्युटर सायन्सचा विद्यार्थी आहे, त्याने अंबानींना जीवे मारण्याची धमकी देऊन ५०० कोटी रुपयांची मागणी केली होती
-
तेलंगणातील वारंगल येथून अटक करून त्याला गावदेवी पोलिसांनी गुन्हे शाखेच्या ताब्यात दिले आहे.
-
एका पोलीस अधिकाऱ्याच्या हवाल्याने फ्री प्रेस जर्नलने दिलेल्या वृत्तानुसार, वनपर्धी याने अंबानींना ४०० कोटींची धमकी मिळाल्याची बातमी एका वाहिनीवर पाहिली तेव्हा त्याने ५०० कोटी रुपयांची मागणी करणारा ईमेल (जीमेल वापरून) पाठवला
-
मुकेश अंबानींना जीवे मारण्याची धमकी देण्याच्या आरोपात अटक केलेले दोन्ही आरोपी ८ नोव्हेंबरपर्यंत गुन्हे शाखेच्या कोठडीत आहेत. (सर्व फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

महाशिवरात्रीला कुंभ राशीत दुर्मिळ त्रिग्रही योग निर्माण झाल्यामुळे ४ राशी जगतील राजासारखे जीवन! तिजोरीत मावणार नाही धन