-
सत्तेचा माज आलेल्यांनी बुलडोझरने शिवसेनेची शाखा पाडली. पण, खरा बुलडोझर घेऊन मुंब्र्यातील रस्त्यावर आलो आहे. आमचे बॅनर फाडल्याचे कळले. पण, निवडणुका येऊद्या तुमची मस्ती फाडतो, असा इशारा शिवसेना ( ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटाला दिला होता.
-
याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. “झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत जनतेनं त्यांना धडा शिकवला आहे. महायुतीचं सरकार १ नंबरला आहे.”
-
“आम्हाला धडा शिकवण्याचा भाषा करणारे मागील निवडणुकीत ५ नंबरला होते. आता ७ नंबरला आहेत. येणाऱ्या निवडणुकीत १० नंबरला जातील,” असा टोला मुख्यमंत्र्यांनी ठाकरे गटाला लगावला.
-
“मुंब्र्यात फुसके बार येऊन गेले, पण वाजलेच नाहीत. कारण, आमच्या कार्यकर्त्यांनी एवढे फटाके वाजवले की काहींना युटर्न घेऊन परत जावं लागलं,” असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरेंना लक्ष्य केलं.
-
“बाळासाहेबांचं प्रेम ठाणे जिल्ह्यावर होतं. ठाणे जिल्हा हा धर्मवीर आनंद दिघे यांचा बालेकिल्ला आहे. त्यामुळे येथील नागरिक काम करणारे आणि घरी बसणारे बरोबर ओळखतात,” असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं.
-
“आमच्या कार्यकर्त्यांनी अतिशय शिस्तीचं दर्शन घडवलं. दिवाळीच्या सणामध्ये विघ्न आणणं कुठल्याही राजकीय नेत्याला शोभत नाही. पण, ज्यांनी सत्तेत असताना कायम सण-उत्सवांवर बंदी घातली. आम्ही आल्यावर सर्व सण उत्सवांवर बंदी उठवली. त्यामुळे काहींना पोटदुखी उठली,” अशी टीकाही मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरेंवर केली आहे.

बापरे! कपलचा घरामागे सुरु होता रोमान्स; किस करताच काकांनी पकडलं अन्…VIDEO पाहून मुलींनो सावध व्हा