-
राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटातील नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्यावर सडकून टीका केली.
-
भुजबळ शुक्रवारी (१७ नोव्हेंबर) जालन्यातील आंबड येथे आयोजित ओबीसी एल्गार मोर्चात मनोज जरांगेंवर टीका करताना नेमकं काय म्हणाले याचा हा आढावा…
-
या महाराष्ट्रातील किती तरी नेते मराठा नेते आहेत. यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, शरद पवार, विलासराव देशमुख, शंकरराव चव्हाण असे कितीतरी नेते मराठा समाजाचे आहेत – छगन भुजबळ
-
मात्र, त्यांनी सर्वांना सोबत घेऊन जाण्याची भूमिका घेतली. त्यांनी घरं जाळण्याची भूमिका घेतली नाही – छगन भुजबळ
-
या महाराष्ट्रात आजही खूप मराठा नेते आहेत. मराठा तरुणांना मला सांगायचं आहे की, याच्या कुठं मागे लागले, या दगडाला शेंदूर लावून हा कुठला देव केलाय – छगन भुजबळ
-
याला कळेना, ना वळेना. लेकरं, लेकरं करतात. मात्र, आमचीही लेकरं आहेत. त्यांनी वेगळं आरक्षण घ्यावं – छगन भुजबळ
-
सगळ्या आयोगांनी सांगितलं की, मराठा आरक्षण देता येणार नाही. त्यात आमचा दोष आहे का? आम्ही काय केलं आहे? – छगन भुजबळ
-
आम्हाला आरक्षण घटनेने दिलं, बाबासाहेब आंबेडकरांनी दिलं, मंडल आयोगाने दिलं. त्यावर सर्वोच्च न्यायालयाच्या ९ न्यायमूर्तींच्या खंडपीठाने शिक्कामोर्तब केलं – छगन भुजबळ
-
यांना काहीच माहिती नाही. हे सकाळी उठतात आणि आमची लेकरं बाळं, आमची लेकरं बाळं बोलतात – छगन भुजबळ
-
त्यांना केवळ दोन शब्दच येतात. ते दोन शब्द म्हणजे आमची लेकरंबाळं. बाकीच्यांची काय लेकरं बाळं नाहीत का? – छगन भुजबळ
-
पुढे ते सांगतात की, छगन भुजबळ दोन वर्षे तुरुंगात बेसण भाकर खाऊन आला. हो, खाऊन आलो – छगन भुजबळ
-
मी छगन भुजबळ दिवाळीतही बेसण, भाकर, ठेचा कांदा फोडून खातो. मात्र, मी स्वकष्टाचं खातो. त्यांच्यासारखं मी सासऱ्याच्या घरी तुकडे मोडत नाही – छगन भुजबळ (सर्व छायाचित्र – संग्रहित, लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

वेश्याव्यवसायातून महिलेची १५ वर्षांनी झाली सुटका, घरी पोहोचताच कुटुंबियांनी…