-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी ( २५ नोव्हेंबर ) बंगळुरू येथील हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडला ( HAL ) भेट दिली.
-
पंतप्रधान मोदींनी तेजस फायटर विमानाच्या उत्पादनाची पाहणी केली. यानंतर पंतप्रधान मोदींनी तेजस या फायटर विमानातून उड्डाण केलं. यावेळी पंतप्रधान मोदी वैमानिकाच्या पेहरावात दिसत होते.
-
पंतप्रधान मोदींनी त्यांच्या सोशल मीडियावर अकाउंटवर काही फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये ते तेजस फायटर विमानात बसलेले दिसत आहेत.
-
पंतप्रधानांनी तेजसच्या उत्पादनासह HAL च्या उत्पादनांचा आढावा घेतला. तेजस हे स्वदेशी फायटर विमान आहे. तेजस कोणत्याही हवामानात उड्डाण करू शकते.
-
मोदींनी ‘एक्स’ ( ट्वीटर ) अकाउंटवर माहिती देताना म्हटलं, “हा अनुभव अविश्वसनीय असा होता. या उड्डाणामुळे आपल्या देशातील स्वदेशी उत्पादनाच्या ताकदीवरील माझा विश्वास आणखी वाढला आहे.”
-
“देशाच्या राष्ट्रीय क्षमतेचा आणि ताकदीचा मला अभिमान आहे. याने नवीन आशावादही निर्माण झाला आहे. संपूर्ण देशवासियांचे अभिनंदन…” असं पंतप्रधान म्हणाले.

होळीनंतर या तीन राशींचे चमकणार सोन्यासारखे नशीब, बँक बॅलेन्समध्ये वाढणार, मिळेल अपार पैसा संपत्ती