-
झोरम पीपल्स मूव्हमेंट (ZPM) नेते लालदुहोमा यांनी ८ डिसेंबर रोजी मिझोरामचे नवीन मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.
-
७४ वर्षीय लालदुहोमा यांनी यापूर्वी आयपीएस अधिकारी म्हणून काम केले आहे. (पीटीआय फोटो)
-
१९७२ ते १९७७ पर्यंत त्यांनी मिझोरामच्या मुख्यमंत्र्यांचे मुख्य सहाय्यक म्हणूनही काम केले. . (पीटीआय फोटो)
-
१९७७ मध्ये यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली. पोलिस सेवेत रुजू झाल्यानंतर त्यांनी गोव्यात गुन्हेगार आणि तस्करांना पकडण्यासाठी पथकप्रमुख म्हणून काम केले
-
१९८२ मध्ये त्यांची माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या सुरक्षा प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली.
-
लालदुहोमा यांनी १९८४ मध्ये पोलीस सेवेचा राजीनामा देऊन काँग्रेस पक्षात प्रवेश केला. (पीटीआय फोटो)
-
काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यानंतर त्यांनी त्याच वर्षी लोकसभा निवडणूक लढवली आणि खासदार म्हणून निवडून आले. फोटो स्रोत: @lalduhomaofficial/instagram)
-
1986 मध्ये त्यांनी काँग्रेस नेत्यांशी मतभेद झाल्यानंतर मिझोराम काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिला.
-
.लालदुहोमा यांनी झोराम राष्ट्रवादी पक्षाची स्थापना केली होती त्यांनी झेडपीएमच्या स्थापनेतही महत्त्वाची भूमिका बजावली होती. (फोटो स्त्रोत: @lalduhomaofficial/instagram)
-
२०१८च्या विधानसभा निवडणुकीत लालदुहोमा यांनी जूना या दोन जागांवर सेरछिप आणि आयझॉल पश्चिम या जागा जिंकल्या. (फोटो स्त्रोत: @lalduhomaofficial/instagram)
-
१७ एप्रिल २०२१ रोजी सेरछिप मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत, लालदुहोमा यांनी त्यांचा मुख्य प्रतिस्पर्धी MNF पक्षाच्या वनलालझोमा यांचा 3,310 मतांनी पराभव करून विधानसभेची जागा परत मिळवली. (फोटो स्रोत: @lalduhomaofficial/instagram)
-
लालदुहोमा यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे झाले तर त्यांच्या पत्नीचे नाव लियानसैलोवी आहे. त्यांना दोन मुलगे असून ते चौलहमुन, आयझॉल येथे राहतात. (फोटो स्त्रोत: @lalduhomaofficial/instagram)

…म्हणून कुणालाच कमी समजू नका! शिकारीसाठी आलेल्या वाघाचा माकडाने केला मोठा गेम; माकडाने असं काय केलं? पाहा Video