-
लोकसभेच्या मुख्य सभागृहात दोन घुसखोरांनी धुराच्या नळकांडया फोडल्यामुळे नव्या संसदभवनाच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. बुधवारी दुपारी घडलेल्या या घटनेमुळे बरोबर २२ वर्षांपूर्वीच्या इतिहासाची पुनरावृत्ती झाल्याचे म्हटले जातेय
-
लोकसभेत तसेच संसदभवन परिसरात धुराच्या नळकांडया फोडणाऱ्या चौघांसह त्यांच्या दोन साथीदारांना पोलिसांनी अटक केली आहे. सागर, मनोरंजन, नीलम व अमोल शिंदे अशी आरोपींची नावे आहेत. विरोधकांनी या घटनेच्या सखोल चौकशीची मागणी करत सरकारला धारेवर धरले
-
लोकसभेमध्ये शून्य प्रहरातील चर्चा सुरू असताना दुपारी १च्या सुमारास सागर शर्मा आणि मनोरंजन डी. या दोन तरुणांनी प्रेक्षक गॅलरीतून मुख्य सभागृहात उडया घेतल्या
-
‘तानाशाही नहीं चलेगी’ अशा घोषणा देत त्यांनी पिवळा धूर सोडणाऱ्या नळकांडया फेकल्या. त्यामुळे सभागृह धुराने भरून गेले
-
घुसखोरांना उपस्थित खासदारांनी चोप दिला व सुरक्षा रक्षकांकडे सोपविले. त्याच वेळी संसदभवन परिसरात नीलम व अमोल शिंदे या दोघांनीही घोषणाबाजी करत धुराच्या नळकांडया फोडल्या.
-
लोकसभेत घुसखोरी केलेल्या या दोन तरुणांना Visitors पास देण्यासाठी म्हैसूरचे भाजप खासदार प्रताप सिम्हा यांनी शिफारस केली होती.
-
घटना घडली त्यावेळी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी, विधिमंत्री अर्जूनराम मेघवाल, काँग्रेसचे राहुल गांधी, अधिररंजन चौधरी यांच्यासह सुमारे १०० खासदार सभागृहात उपस्थित होते.
-
पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच गृहमंत्री अमित शहा हे शपथविधी सोहळय़ांसाठी रायपूर व भोपाळला गेल्याने सभागृहात नव्हते.
-
तब्ब्ल २२ वर्षांपूर्वी १३ डिसेंबरला २००१ साली सुद्धा संसदेवर दहशतवादी हल्ला झाला होता. त्यासाठीच काल संसद परिसरात शहिदांना श्रद्धांजली सुद्धा वाहण्यात आली होती.(सर्व फोटो: PTI/ लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
पत्नी, मुलासमोर दहशतवाद्यांनी डोंबिवलीतील पर्यटकाच्या डोक्यात गोळ्या झाडल्या, मुलावर वडिलांचा मृतदेह पाहण्याची वेळ