-
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि मंत्री हसन मुश्रीफ यांच्यात पुन्हा टीका-टिप्पणी सुरू झाली आहे.
-
“एकनाथ शिंदे गुवाहाटीला गेल्यानंतर भाजपाबरोबर सत्तेत जाण्यासाठी जितेंद्र आव्हाडांनी पुढाकार घेतला होता. ५३ आमदारांमध्ये सर्वात पहिली सही जितेंद्र आव्हाडांची होती,” असा दावा हसन मुश्रीफांनी केला होता. याला आव्हाडांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ते प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.
-
जितेंद्र आव्हाड म्हणाले, “माझ्या राजकीय जीवनात हसन मुश्रीफांना ५ मिनिटांवरती अधिक मी बोललो नाही. २०१९ साली शरद पवारांच्या पुण्यातील घरी बैठक झाली होती. त्या बैठकीला सर्व प्रमुख नेते उपस्थित होते. तेव्हा हसन मुश्रीफांनी भाजपाबरोबर जाऊ नये म्हणून टोकाचा विरोध केला होता.”
-
जितेंद्र आव्हाडांनी म्हटलं, “नंतर २०२२ साली एकनाथ शिंदेंची फूट पडल्यानंतर सर्वजण अजित पवारांच्या कार्यालयात एकत्र आलो. त्यावेळी शरद पवारांना पत्र लिहित भाजपाबरोबर जाण्यासाठी विनंती करू, असं ठरलं. मी पत्रावर सही केली. पण, बाहेर आल्यानंतर जयंत पाटलांना सांगितलं की, ‘माझी सही मान्य नाही. मी काय भाजपाबरोबर जाणार नाही.’”
-
“जयंत पाटीलही त्याच विचारांचे होते. जयंत पाटलांनी शरद पवारांना पत्र दिलंच नाही. आजही ते पत्र जयंत पाटलांकडे आहे. नंतर भाजपाबरोबर जाण्यासाठी सतत आग्रह करणाऱ्यांमध्ये हसन मुश्रीफही होते,” असं आव्हाडांनी सांगितलं.
-
‘आव्हाड एकाकी पडले आहेत. पक्षात कुणीच विचारत नसल्यानं थोटे भ्रमिष्ट अवस्थेत आहेत,’ अशी टीका हसन मुश्रफांनी केली होती. यावर बोलताना आव्हाडांनी म्हटलं, “मी माझ्या बापाशी गद्दारी केली नाही. सदाशिवराव मंडलिक यांनी तुम्हाला कुठं पोहचावलं हे सगळ्या कोल्हापुरला माहिती आहे. मी तुमच्या नादाला लागलो नाही. माझ्या तोंडाला लागू नका.”

‘लाखात एक आमचा दादा’ फेम मराठी अभिनेते संतोष नलावडे यांचे अपघाती निधन