-
इथून पुढं फक्त माझे ऐका. बाकी कुणाचं ऐकू नका. बाकीच्यांचं खूप वर्षे झालं ऐकलं आहे. आता माझे ऐका, असं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना लक्ष्य केलं होतं. यावर शरद पवार यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
-
अजित पवारांच्या वक्तव्यावर प्रसारमाध्यमाच्या प्रतिनिधिनं विचारलं असता शरद पवार म्हणाले, “बारामतीमध्ये मागील १० वर्षात माझे कोणत्याही काम लक्ष नाही. येथील स्थानिक निवडणुका, साखर कारखाने, शैक्षणिक संस्थांबाबत मी निर्णय घेतलेले नाहीत.”
-
“गेल्या १० वर्षात मी लक्ष दिलं नसल्यामुळे या क्षेत्रात कुणी काम करावे, हा ज्याचा त्याचा निर्णय आहे. सर्वांना बरोबर घेऊन केवळ या भागाचा विकास व्हावा, ही माझी इच्छा आहे. राज्यात नव्या तरूणांना प्रोत्साहन देण्याची काळजी मी घेतली आहे. याचा मला आनंद वाटतो,” असं शरद पवारांनी म्हटलं.
-
“मी ६० वर्षांचा झाल्यावर वेगळी भूमिका घेतली. काहींनी ३८ व्या वर्षी वेगळी भूमिका घेतली होती,” असंही वक्तव्य अजित पवारांनी केलं होतं. यावर शरद पवार म्हणाले, “माझे बंड नव्हतेच. आमच्या काळात आम्ही सर्वांनी बसून निर्णय घेतला होता.”
-
“यशवंतराव चव्हाण त्यावेळी महाराष्ट्राचे नेते होते. त्यांचा विचार घेऊनच निर्णय घेतला. त्यासंबंधी आज तक्रार करण्याचे काही कारण नाही. आज कुणी काही केले त्याचीही मला तक्रार करायची नाही,” असं शरद पवारांनी सांगितलं.
-
“फक्त लोकांनी ज्या पक्षाला शक्ती दिली, त्याचा संस्थापक कोण आहे? या सर्व गोष्टी सर्वांच्या समोर आहेतच. त्यामुळे यावर मला अधिक चर्चा करायची नाही,” असं शरद पवारांनी म्हटलं. ( फोटो सौजन्य – संग्रहित छायाचित्र )

Pahalgam Terror Attack : गोळीबार सुरू होताच झाडावर चढून केलं संपूर्ण हल्ल्याचं रेकॉर्डिंग; स्थानिक व्हिडीओग्राफर बनला NIAचा प्रमुख साक्षीदार