-
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निशाण्यावर आता शिरूर मतदारसंघाचे खासदार अमोल कोल्हे आले आहेत. अजित पवार यांनी “शिरूरमध्ये उमेदवार निवडून आणणारच,” असा निर्धार व्यक्त करत अमोल कोल्हेंना आव्हान दिलं आहे. यावर अमोल कोल्हेंनी प्रतिक्रिया दिली आहे.
-
तर, “१०० टक्के मी निवडणूक लढवणार. शरद पवार घेतील तो निर्णय मला मान्य असेल,” असं अमोल कोल्हेंनी म्हटलं आहे.
-
“अजित पवार हे मोठे नेते आहेत. माझ्यासारख्या लहान कार्यकर्त्याला ते आव्हान देतील, असं वाटत नाही. कारण, शिरूर मतदारसंघातील कामांचं अजित पवारांनी कौतुक केलं आहे,” असं अमोल कोल्हे म्हणाले.
-
“कांद्याच्या निर्यातीबाबत शेतकऱ्यांमध्ये आक्रोश आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न पदयात्रेतून मांडणार आहोत. अजित पवारांनी पदयात्रेला पाठिंबा दिला पाहिजे. कांद्याची निर्यातबंदी उठवण्यासाठी अजित पवारांनी आमच्या सुरात सूर मिसळला पाहिजे,” असं आवाहन अमोल कोल्हेंनी केलं आहे.
-
अजित पवारांनी शिरूरमधून लोकसभेचा उमेदवार उभा केला, तर त्याविरोधात निवडणूक लढवणार का? या प्रश्नावर अमोल कोल्हे म्हणाले, “मी शिरूर मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत आहे. शिरूरचा चेहरा मोहरा बदलण्याचं काम शरद पवारांनी केलं आहे.”
-
“निवडणूक एकमेकांना आव्हान देण्याची गोष्ट नाही तर प्रतिनिधित्व आणि प्रश्न मांडण्याची गोष्ट आहे. मी १०० टक्के निवडणूक लढवणार आहे. याचा निर्णय शरद पवार घेतील,” असं अमोल कोल्हेंनी म्हटलं.

Waqf Bill Controversy: “अलविदा नितीश कुमार..”, वक्फ विधेयक मंजूर होताच नितीश कुमारांच्या पक्षात बंडखोरी; नाराज नेत्यांचे राजीनामे