-
इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबतचा सेल्फी शेअर केला.
-
भारत एकदिवसीय क्रिकेट विश्वचषकात पराभूत झाल्यानंतर त्यांनी ड्रेसिंग रुममध्ये जाऊन भारतीय क्रिकेटपटूंची भेट घेतली.
-
नव्या संसद भवनाचे उदघाटन करत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पवित्र सेन्गोलची पूजा केली.
-
तमिळनाडूतील चेन्नई येथे दौऱ्यावर असताना भाजपाच्या दिव्यांग कार्यकर्त्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सेल्फी घेतला होता.
-
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी पंतप्रधानांच्या निवासस्थानाला भेट दिली. त्यावेळचे क्षणचित्र.
-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडच्या भेटीदरम्यान बेंगळुरू येथे तेजस लढाऊ विमानाची फेरी मारली.
-
गुजरातमध्ये वायब्रंट गुजरात ग्लोबल समिट भरविलेले असताना पंतप्रधान मोदी यांनी रोबोटिक गॅलरीला भेट दिली. यावेळी एक रोबोट मोदींसाठी चहा आणि सँडविच घेऊन आला.
-
चांद्रयान ३ मोहीम यशस्वी झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी इस्रोचे अध्यक्ष एस. सोमनाथ यांचे अभिनंदन व्यक्त करताना गळाभेट घेतली. चांद्रयान ३ मोहीम यशस्वी झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी इस्रोचे अध्यक्ष एस. सोमनाथ यांचे अभिनंदन व्यक्त करताना गळाभेट घेतली. भारतासाठी हा अभिमानाचा क्षण होता. कारण चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर जाणारा भारत हा पहिला देश ठरला. त्यामुळे हा फोटो खास आहे.
-
फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फ्रान्सचा सर्वोच्च पुरस्कार प्रदान करताना त्यांचे स्वागत केले.
-
दिल्ली येथे सप्टेंबर महिन्यात जी२० शिखर परिषद संपन्न होत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्याचे अध्यक्षपद भुषविले.
-
दरवर्षी दिवाळीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी सीमेवर जाऊन सैनिकांसह दिवाळी साजरी करत असतात. यावर्षी ते सीमेवर गेले असताना तिथे असलेल्या प्राण्यांसह एक निवांत क्षण घालवताना.
-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दिल्लीतील ७, लोक कल्याण मार्गावरील शासकीय निवासस्थानी विविध प्राणी आहेत. घरी असताना पंतप्रधान मोदी त्यांच्यासह थोडा वेळ घालवितात.

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”