-
नववर्षाचा पहिला दिवस आणि शौर्यदिनानिमित्त भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभाला लाखो आंबेडकरी अनुयायांनी सोमवारी अभिवादन केले.
-
भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी राज्यभरातील विविध ठिकाणांहून अनुयायी आले आहेत.
-
प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. पंचक्रोशीत कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
-
युवकांनी पुण्यापासून दुचाकी फेरी काढून भीमा कोरेगाव गाठले.
-
विजयस्तंभ परिसरात रविवारी मध्यरात्रीपासून आतषबाजी तसेच सामुदायिक बुद्ध वंदनेने कार्यक्रमास सुरुवात झाली.
-
अभिवादन करण्यासाठी कोरेगाव भीमा आणि पेरणे परिसरात येणाऱ्या लाखो अनुयायांना कोणत्याही सुविधा कमी पडणार नाहीत, याबाबतची खबरदारी जिल्हा प्रशासनाने घेतली आहे.
-
यावर्षी मोठ्या संख्येने येणाऱ्या अनुयायांबरोबरच बंदोबस्तावरील पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सुविधेसाठी जिल्हा प्रशासनाने वाढीव संख्येने जय्यत तयारी केली होती.
-
विजयस्तंभाला फुलांची सजावट करण्यात आली आहे.
-
फोटो सौजन्य- लोकसत्ता टीम

उन्हाळ्यात कलिंगड खाण्यापूर्वी हा व्हिडिओ पाहा! रंगाचे इंजेक्शन दिलेले कलिंगड कसे ओळखावे? काकुंनी सांगितला सोपा जुगाड