-
गुरुग्राममधील सीटी पॉईंट हॉटेलमध्ये माजी मॉडेल दिव्या पाहुजाची गोळ्या झाडू हत्या करतण्यात आली. दिव्या पाहुजा कधीकाळी गँगस्टर संदीप गडोलीची प्रेयसी होती. ७ फेब्रुवारी २०१६ रोजी संदीपची मुंबईत चकमकीत हत्या करण्यात आली. या हत्येच्या आरोपाखाली दिव्या पाहुजाने सात वर्ष तुरुंगवास भोगला.
-
हरियाणा पोलिसांनी संदीप गडोलीला चकमकीत ठार केले होते. पण त्याचा तपास मुंबई पोलिसांनी केला. त्यात दिव्याला प्रमुख आरोपी करण्यात आले. इथूनच दिव्याचे वाईट दिवस सुरू झाले.
-
२ जानेवारी २०२४ रोजी दिव्याच्या आयुष्यातला शेवटचा दिवस ठरला. नववर्षाच्या स्वागतासाठी ती अभिजीत सिंह या आपल्या मित्रासह फिरायला गेली होती. मात्र दोन दिवस तिचा काहीच पत्ता न लागल्यामुळे कुटुंबियांनी पोलिसांत तक्रार दाखल केली.
-
पोलिसांनी अभिजीत सिंहच्या सीटी पॉईंट हॉटेलमध्ये तपास करून सीसीटीव्ही चित्रण हस्तगत केले. ज्यामध्ये दिव्या आणि तो एकत्र आल्याचे पाहायला मिळाले.
-
मात्र २ जानेवारी रोजी तीन लोक चादरीत गुंडाळलेला दिव्या पाहुजाचा मृतदेह बाहेर घेऊन जाताना दिसले. त्यानंतर पोलिसांनी संबंधितावर गुन्हे दाखल करत तपासाला वेग दिला.
-
अभिजीत सिंहने गुरुग्राम पोलिसांना सांगितले की, त्याचे काही अश्लील छायाचित्र दिव्याजवळ होते. ज्यावरून ती अभिजीतला ब्लॅकमेल करत होती. २ जानेवारी रोजी अभिजीतने दिव्याला फोटो डिलीट करण्यास सांगितले होते, मात्र तिने नकार दिल्यानंतर रागात येऊन गोळी झाडल्याचे अभिजीतने कबूल केले.
-
दिव्या पाहुजा ही केवळ २७ वर्षांची होती. २०१६ चकमकीत तिलाही आरोपी केल्यामुळे तिने मुंबईत सात वर्ष तुरुंगात काढले होते. जून २०२३ ला ती जामिनावर बाहेर आली होती.
-
२०१६ साली जेव्हा दिव्या मुंबईत संदीप गडोलीसह होती, तेव्हा तिचे वय केवळ १८ वर्षांचे होते. तिच्यासह याच गुन्ह्यात तिच्याआईलाही अटक करण्यात आले होते.
-
वाणिज्य शाखेतून पदवीधर असलेल्या दिव्याला बाहेर येऊन एलएलबी करायचे होते. पुन्हा एकदा मॉडेलिंगमध्ये करियर करायचे होते. कारावासात असताना तिने कायद्याच्या अनेक पुस्तकांचे वाचनही केले होते. मात्र तिची स्वप्न पूर्ण होण्याआधीच तिची हत्या करण्यात आली.

पदरात पडेल सुख ते हितशत्रूंपासून रहा सावध; प्रदोष व्रताबरोबर अनंग त्रयोदशीचा योगायोग तुमच्या आयुष्यात भरणार का नवे रंग? वाचा राशिभविष्य