-
अयोध्येतील बहुप्रतीक्षित राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठेचा दिवस जवळ येऊन ठेपला आहे. २२ जानेवारीला प्राणप्रतिष्ठा होणार असून १६ जानेवारीपासूनच त्याच्याशी संबंधित विविध विधींना सुरुवात झाली आहे. (Image: Shri Ram Janmbhoomi Teerth Kshetra Twitter Handle)
-
प्राणप्रतिष्ठा विधीद्वारे मूर्तीचं देवतेत रूपांतर होते. मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर भक्तगण त्या देवतकडे प्रार्थना करु शकतात आणि देवता त्यांना आशिर्वादही देते असं मानलं जातं. यासाठी मूर्तीवर विविध विधी केले जातात, त्यानंतर मूर्तीला देवत्त्व प्राप्त होतं. सोहळा किती सर्वसमावेशक आहे यावर ही प्रक्रिया किती मोठी असणार हे ठरते. (Photo: Indian Express/Chitral Khambhati)
-
दरम्यान, अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्यानिमित्त देशभरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. या सोहळ्याची जय्यत तयारी सुरू असून देशातील जनता या दिवसाची आतुरतेने वाट पाहत आहे. (Photo: Indian Express/Chitral Khambhati)
-
२२ जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत अयोध्येमध्ये प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. दरम्यान, १६ जानेवारी म्हणजे आजपासूनच या सोहळ्याशी संबंधित अनेक विधींना सुरुवात झाली आहे. (Photo: Indian Express/Chitral Khambhati)
-
रामलल्लांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठेआधी अयोध्येमध्ये त्यांच्या वेगवेगळ्या अधिवासांची तयारी करण्यात आली आहे. त्यांच्यासाठी एक पलंग बनवण्यात आला आहे.
-
याशिवाय त्यांच्यासाठी गाडी, राजाई, चादर, उशी यांची देखील खरेदी करण्यात आली आहे. इतकंच नाही तर रामलल्लांसाठी खास कपडे देखील बनवून घेण्यात आले आहेत. (Photo: Indian Express/Chitral Khambhati)
-
२२ जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोगी यांच्या उपस्थितीत प्राणप्रतिष्ठा केली जाणार असून वारणसीचे वैदिक आचार्य ही पूजा करणार आहेत. आचार्य गणेशवर शास्त्री द्रविड, प्रमुख आचार्य लक्ष्मीकांत दीक्षित, अरुण दीक्षित, सुनील दीक्षित, दत्तात्रेय नारायण रटाटे, गजानन जोतकर, अनुपम दीक्षित तसेच आणखी ११ यजमानांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न होणार आहे. (Photo: Indian Express/Chitral Khambhati)
-
विहिंपनेही सोमवारी प्राणप्रतिष्ठा पूजेचा क्रम स्पष्ट केला असून, मूर्ती ज्या ठिकाणी निर्माण करण्यात आली आहे, तेथूनच कर्मकुटी विधीने पूजेला सुरुवात होणार आहे. मूर्ती तयार करणारे कारागीर प्रायश्चित पूजन करणार आहेत. (Photo: Indian Express/Chitral Khambhati)
-
असे म्हटले जात आहे की १६ तारखेपासून २२ तारखेपर्यंत प्रत्येक दिवशी केल्या जाणाऱ्या विधीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आज आपण या साथ दिवसांची रूपरेषा जाणून घेऊया. (Photo: ANI)
-
१६ जानेवारीपासून पूजेची प्रक्रिया सुरू होणार आहे. कार्यक्रमानुसार या दिवशी प्रायश्चित्त व कर्मकुटी पूजा होईल. (Image: Shri Ram Janmbhoomi Teerth Kshetra Twitter Handle)
-
१७ जानेवारीला श्रीविग्रह परिसरात मिरवणूक काढली जाईल आणि गर्भगृहाचे शुद्धीकरण केले जाईल. या दिवशी रामलल्लांची मूर्ती रामजन्मभूमी संकुलात प्रवेश करेल. (Photo: ANI)
-
१८ जानेवारीपासून अधिवास सुरू होतील. दोन्ही वेळा जलाधिवास, सुगंध आणि गंधअधिवास देखील असेल. तसेच, प्राणप्रतिष्ठा करण्यात येणारी श्रीरामाची मूर्ती १८ जानेवारीला गाभाऱ्यामध्ये स्थापित केली जाईल. (Image: Shri Ram Janmbhoomi Teerth Kshetra Twitter Handle)
-
१९ जानेवारीला सकाळी औषधाधिवास, केशराधिवास, घृताधिवास आणि सायंकाळी धान्याधिवास होईल. (Photo: ANI)
-
२० जानेवारीला सकाळी शाखाराधिवास, फलाधिवास आणि सायंकाळी पुष्पाधिवास असेल. (Photo: ANI)
-
२१ जानेवारीला 21 जानेवारी रोजी सकाळी मध्याधिवास आणि सायंकाळी शय्याधिवास असेल. (Photo: ANI)
-
२२ जानेवारी 2024 रोजी रात्री १२.२९ ते १२.३० या वेळेत रामलल्लाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होणार आहे. प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा मुहूर्त वाराणसीमधील ज्ञानेश्वर शास्त्री द्रविड यांनी काढला आहे. (Photo: Indian Express/Chitral Khambhati)
-
वाराणसी येथील लक्ष्मीकांत दीक्षित यांच्या मार्गदर्शनाखाली १२१ पुरोहित हा धार्मिक विधी करणार आहेत. अवघ्या ८४ सेकंदात हा पवित्र प्राण प्रतिष्ठा सोहळा पार पडेल आणि अयोध्येतील राम मंदिराची प्रतिक्षा अखेर संपेल. (Photo: Indian Express/Chitral Khambhati)
-
दरम्यान, कार्यक्रमाच्या तयारीसाठी २० व २१ जानेवारी रोजी सर्वसामान्य भाविकांसाठी दर्शन बंद राहील. (Photo: Indian Express/Chitral Khambhati)

“आता काय जीवच घेणार का?” महिलांनो तुम्हीही बाजारातून विकतच दही आणता का? थांबा अमूलच्या दहीचा ‘हा’ VIDEO पाहून धक्का बसेल