-
आज सोमवार (दि. २२ जानेवारी) रोजी अयोध्येतील राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडणार आहे. (Photo – ANI)
-
या कार्यक्रमासाठी संपूर्ण अयोध्या नगरी सजली आहे. (Express Photo By Narendra Vaskar)
-
यानिमित्ताने संपूर्ण देशात रामभक्तीचे वातावरण आहे. (Express Photo by Sankhadeep Banerjee)
-
अनेक शहरांमध्ये मिरवणुका काढण्यात येत आहेत. (Express Photo by Sankhadeep Banerjee)
-
अयोध्या येथील राम मंदिरामध्ये श्रीराम मूर्तीची सोमवारी प्राणप्रतिष्ठा होत असल्याचे औचित्य साधून पूर्वसंध्येला करण्यात आलेल्या नयनरम्य रोषणाईने रविवारी जेजुरी गड असा उजळून निघाला होता.
-
नदीपात्रातील रस्त्यावर आमदार रवींद्र धंगेकर यांच्या वतीने रविवारी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. (Express Photo By Pavan Khengre)
-
आकाशामध्ये झेप घेणाऱ्या या आतषबाजीचे रामभक्तांनी मोबाइलमध्ये छायाचित्र टिपले. (Express Photo By Pavan Khengre)
-
राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यातर्फे डोंबिवली येथील ह. भ. प सावळाराम क्रीडा संकुल येथे एक लाख ११ हजार १११ दिव्यांमधून रामाची प्रतिकृती साकारण्यात आली. (Express Photo By Deepak Joshi)
-
या विक्रमाची ‘इंडिया वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नोंद झाली. (Express Photo By Deepak Joshi)
-
यावेळी फटाक्यांची आतषबाजी आणि महाआरती करण्यात आली. (Express Photo By Deepak Joshi)
-
ठाण्यातील मासुंदा तलाव परिसरात रोषणाई करण्यात आली आहे.
-
प्राण प्रतिष्ठेच्या पूर्वसंध्येला शरयू नदीचे घाट लेझर किरणांच्या प्रकाशात अधिक उजळले.

बापरे! मुंबई लोकलच्या महिला डब्यात धक्कादायक प्रकार; पोलीस असूनही घडलं भयंकर, VIDEO पाहून धडकी भरेल