-
शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे तरुण नेते आणि वॉर्ड क्र. ७ चे माजी नगरसेवक ४१ वर्षीय अभिषेक घोसाळकर यांची ८ फेब्रुवारी रोजी गोळ्या घालून निर्घृण हत्या करण्यात आली. (Experess Photo)
-
अभिषेक घोसाळकर हे शिवसेना उबाठाचे माजी आमदार विनोद घोसाळकर यांचे चिरंजीव. विनोद घोसाळकर हे २००९ ते २०१४ या काळात आमदार होते.
-
अभिषेक घोसाळकर यांनी तरूण वयात नगरसेवक पद भूषविले. तसेच ते मुंबै बँकेचे संचालकदेखील होते.
-
अभिषेक घोसाळकर यांची पत्नी तेजस्वीनी घोसाळकरदेखील राजकारणात सक्रिय आहेत. वॉर्ड क्र. १ मधून त्या नगरसेविका होत्या. दहिसर आणि बोरीवलीमध्ये घोसाळकर कुटुंबिय राजकीयदृष्ट्या चांगलेच सक्रिय आहे.
-
कुटुंबवत्सल म्हणून अभिषेक घोसाळकर यांना ओळखले जात होते. अभिषेक आणि तेजस्वीनी (दरेकर) यांचे २०१३ रोजी लग्न झाले होते. अनेक राजकीय-सामाजिक कार्यक्रमात दोघेही पती-पत्नी एकत्र दिसत असत. दोघांनीही एकमेकांसह राजकीय वाटचाल सुरू केली.
-
करोना काळात घोसाळकर दाम्पत्यांनी दहिसरमध्ये लोकांसाठी बरंच काम केलं. वॉर्डातील झोपडपट्टीत जाऊन जनजागृती करणं, त्यांना मदत पुरविण्याचं काम अभिषेक आणि तेजस्विनी यांनी केलं होतं.
-
अभिषेक आणि तेजस्विनी घोसाळकर यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर दोघांचे एकत्रितपणे समाजकार्य करतानाचे शेकडो फोटो आहेत. प्रत्येक सण ते लोकांसह साजरे करत असत.
-
सार्वजनिक जीवनात काम करत असताना दोघे पती-पत्नी कुटुंबासाठीही वेळ काढताना दिसत. मुलांबरोबर सुट्टी घालवण्याचे क्षणही घोसाळकर दाम्पत्याने आपल्या सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
अभिषेक आणि तेजस्विनी घोसाळकर यांच्या अनेक मुलाखती युट्यूबवर आहेत. अधिकाधिक व्हिडिओ हे फक्त दहिसर आणि वॉर्डाच्या विकासाबाबत बोलतानाचे आहेत. दहिसरसाठी झोकून देऊन काम करणाऱ्या अभिषेक घोसाळकरांचा अकाली मृत्यू घोसाळकर कुटुंबियासह दहिसरमधील नागरिकांनाही धक्का देणारा आहे.
-
अभिषेक घोसाळकर यांच्या मृत्यूनंतर त्यांचा मारेकरी मॉरिस यानेही आत्महत्या केल्यामुळे या प्रकरणाबाबत अनेक तर्क-वितर्क लढविण्यात येत आहेत. राजकीय आरोप-प्रत्यारोप होत आहेत. (Express Photo)
-
पोलिसांनी मॉरिसचे सहकारी आणि जवळच्या व्यक्तींना अटक केलेली असून या प्रकरणाचा खोलात जाऊन तपास सुरू आहे. पूर्वीच्या वैमन्यसातून हा दुर्दैवी प्रकार घडला असला तरी मॉरिसने स्वतःला का संपवलं? हा प्रश्न अनुत्तरीत राहतो. अभिषेक घोसाळकर यांच्या यंत्रयात्रेला मोठा जनसागर लोटला. (Express Photo)
-
अभिषेक घोसाळकर आणि तेजस्विनी घोसाळकर यांच्या लग्नाचा वाढदिवस १४ फेब्रुवारीला होता. त्यामुळे त्यांनी कुटुंबासह बाहेरगावी जाऊन हा दिवस साजरा करण्याचे नियोजन केले होते. पण त्यापूर्वीच काळाने त्यांच्यावर घाला घातला.
-
शिवसेना उबाठा गटाचे नेते उद्धव ठाकरे, संजय राऊत, आदित्य ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांनी घोसाळकर कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. (Express Photo)
![Devendra Fadnavis Statement on Ladki Bahin Yojana](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/DF2.jpg?w=300&h=200&crop=1)
Ladki Bahin : लाडकी बहीण योजनेबाबत देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य, “ज्या महिला अपात्र ठरल्या आहेत त्यांना मिळालेला निधी…”