-
फेब्रुवारी महिन्याला प्रेमाचा महिना म्हणतात. या महिन्यात लोक आपल्या क्रश, पार्टनर किंवा जवळच्या व्यक्तींसमोर आपलं प्रेम व्यक्त करण्यासाठी आतुर असतात.
-
तसं पाहिलं तर हा आठवडा या जोडप्यासाठी एखाद्या सणापेक्षा कमी नाही. मुळात व्हॅलेंटाईन दिवस हा केवळ दोन जोडप्यांचा दिवस नसतो तर प्रेमाचा दिवस असतो.
-
‘जिंदगी हसीन है, तो इश्क़ सुकून है’ असं म्हणत पुण्यात ‘राईट टू लव्ह’चा ‘प्रेमोत्सव’ उत्साहात साजरा करण्यात आला.
-
लाल रंगाचे फुगे, ट्रम्पेट वर वाजणारी मराठी हिंदी चित्रपटातील सुरेल प्रेम गीते, प्रेम कविता यामुळे प्रेमोत्सवात रंगत आली. गजबजलेल्या जे. एम. रोडवरील बालगंधर्व रंगमंदिर शेजारी सुट्टीच्या दिवशी अनेक तरुण तरुणींनी या अनोख्या कार्यक्रमाला हजेरी लावली.
-
हा कार्यक्रम अनहद सोशल फाऊंडेशन आयोजित मानस संस्था आणि परभन्ना फाऊंडेशनच्या सहयोगाने उत्साहात पार पडला. यावेळी प्रेम कवितांची कवितांची मैफिल चांगलीच रंगली होती.
-
कवी प्रा. सुमित गुणवंत, हृद्यमानव अशोक, जितेश सोनावणे, प्रगत पडघन आदींनी आदर्श आणि समानतेच्या कविता सादर केल्या तर प्रवीण खुंटे आणि मिलींद दामोदरे यांनी प्रेम गीते सादर करून कार्यक्रम प्रेक्षकांना खिळवून ठेवले.
-
फोटो काढण्यासाठी आकर्षक सजावट करून सेल्फी पॉइंट उभारण्यात आले होते. यावेळी बदामामध्ये मोठ्या अक्षरात ‘सुकून है’ लिहिलेलं होतं तर त्या खाली ” कवी, राहुल सिद्धार्थ साळवे यांच्या “एखाद्याचे सोबत असणे जगणे वाटू लागावे याहून वेगळे प्रेम नसते काही” या ओळी होत्या.
-
‘व्हॅलेंटाईन डे’ आधीच चार दिवस आधीच रंगलेल्या या प्रेमोत्सव कार्यक्रमाचे सगळ्यांनाच कुतुहूल होते. त्यामुळे गजबजलेल्या जे एम. रोडवर लोकांनी व्हॅलेंटाईन डे आधीच प्रेमाच्या उत्साहाचा आनंद लुटला. यानिमित्त आलेल्या सर्व तरुण तरुणींनी राईट टू लव्हच्या कामाबद्दल जाणून घेतेले.
-
या कार्यक्रमासाठी आकाश धनविज, दीप्ती नितनवरे (अनहद सोशल फाऊंडेशन) स्वप्नील जाधव (मानस संस्था), गणेश चप्पलवार (परभन्ना फाऊंडेशन), सागर काकडे (मुक्ताई प्रतिष्ठान), आकाश शिंदे, ज्योतिबा आणि तृप्ती कांबळे, अमरजा शिंदे, गौरव नितनवरे, सुचिता सावंत, अजिंक्य शिंदे आदींनी मोलाचे सहकार्य केले.

५ मार्चनंतर पैसाच पैसा! गजकेसरी राजयोगामुळे ‘या’ तीन राशींना मिळेल अपार श्रीमंती, होईल अचानक धनलाभ