-
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट आणि पवार कुटुंबियांत फूट पडल्यानंतर बारामती लोकसभेला काय होणार? याची उत्सुकता संबंध महाराष्ट्राला आहे.
-
गेल्या ५० हून अधिक वर्ष पवार कुटुंबियांचे बारामती तालुक्यावर एकहाती वर्चस्व आहे. १९९१ साली अजित पवार येथून लोकसभेवर निवडून गेले होते. त्यांच्यानंतर शरद पवार आणि आता सुप्रिया सुळे निवडून जात आहेत. आता कदाचित सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे असा सामना होऊ शकतो.
-
राष्ट्रवादीत दोन गट पडल्यानंतर अजित पवार यांनी बारामती लोकसभा मतदारसंघ मिळविण्यावर लक्ष केंद्रीत केले आहे. ते पत्नी सुनेत्रा पवार यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्याच्या तयारीत आहेत.
-
२०१४ आणि २०१९ साली भाजपाने हा मतदारसंघ जिंकण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले होते. पण त्यांना यश मिळाले नाही. यावेळी अजित पवार यांच्या माध्यमातून हे यश मिळते का ते पाहावे लागेल?
-
सुनेत्रा पवार या महाराष्ट्राला अजित पवार यांच्या पत्नी म्हणून परिचित असल्या तरी बारामती आणि आसपासच्या तालुक्यात त्या चांगल्याच परिचित आहेत. विविध सामाजिक संस्थांच्या माध्यमातून त्यांनी गेल्या काही वर्षांपूर्वीच कामाला सुरुवात केली.
-
सुनेत्रा पवार यांची माहेरची पार्श्वभूमीही राजकीय आहे. त्या धाराशीव जिल्ह्यातील नेते पद्मसिंह पाटील यांच्या भगिनी आहेत. त्यांचे पुतणे राणा जगजितसिंह पाटील हे धाराशिवचे आमदार आहेत.
-
अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांना पार्थ आणि जय अशी दोन मुले आहेत. त्यापैकी पार्थने राजकीय क्षेत्रात प्रवेश केला असून २०१९ साली मावळ लोकसभेतून त्यांनी निवडणूक लढविली होती. मात्र त्यांचा पराभव झाला.
-
सुनेत्रा पवार यानी २०१० मध्ये एन्व्हायर्नमेंटल फोरम ऑफ इंडियाची स्थापना केली होती. या संस्थेच्या माध्यमातून त्या पर्यावरणाच्या विषयावर काम करतात. शरद पवार यांनी स्थापन केलेल्या विद्या प्रतिष्ठान या संस्थेच्या त्या विश्वस्तदेखील आहेत. बारामतीमध्ये सुनेत्रा पवार चांगल्याच सक्रिय असतात.
-
सुनेत्रा पवार यांनी सामाजिक क्षेत्रात केलेल्या कामाची जाहिरात करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून एक रथ तयार करण्यात आला आहे. बारामती मतदारसंघात ठिकठिकाणी हा रथ सध्या फिरताना दिसत आहे.
-
याशिवाय सुनेत्रा पवार बारामतीमधील हाय-टेक टेक्स्टाईल पार्क लिमिटेडच्या अध्यक्षा आहेत. या कंपनीच्या माध्यमातून बारामतीमधील हजारो महिलांना रोजगार प्राप्त करून देण्यात आला आहे. याठिकाणी १५,००० महिला काम करत असल्याचे सांगितले जाते.
-
सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे यांचे आतापर्यंतचे संबंध कसे आहेत? याची फार माहिती समोर आलेली नाही. कौटुंबिक समारंभात दोन्ही कुटुंब अनेकदा एकत्र दिसलेले आहेत.
-
सुनेत्रा पवार यांना उमेदवारी मिळेल, अशी शक्यता दिसत असल्यामुळे सुप्रिया सुळे यांनी ‘तगडा’ उमेदवार देण्याचे आवाहन करताना चर्चेचे आमंत्रण दिले आहे.
-
सुनेत्रा पवार यांना जाहीर सभांमधून किंवा चर्चासत्रातून अधिक बोलताना कधी पाहिलेले नाही. त्यामुळे आगामी काळात त्यांना उमेदवारी मिळाली तर त्या जाहीर संभामधून काय आणि कशा बोलतात? याकडे बारामतीकरांचे नक्कीच लक्ष असेल.

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”