-
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात हृदयविकाराच्या धक्क्याने आज म्हणजेच २३ फेब्रुवारीला पहाटे तीनच्या सुमारास निधन झाले, ते ८६ वर्षाचे होते.
-
गुरुवारी रात्री अत्यवस्थ वाटू लागल्याने जोशी यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आयसीयूमध्ये उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली. (PTI)
-
महाराष्ट्रातील पहिले बिगर काँग्रेसी मुख्यमंत्री, बाळासाहेब ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू म्हणून मनोहर जोशी यांची ओळख होती. गेली काही वर्षे ते सक्रिय राजकारणापासून दूर होते. (Express Archive)
-
आज आपण मनोहर जोशी यांच्या आठवणींना उजाळा देत त्यांच्या राजकीय प्रवासावर एक नजर टाकूया. (Express Archive)
-
मनोहर जोशी यांचा जन्म २ डिसेंबर १९३७ या दिवशी रायगड जिल्ह्यातील नांदवी या गावात झाला होता. (PTI)
-
दहावीपर्यंतचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मनोहर जोशी अकरावीला शिकण्यासाठी मुंबईत त्यांच्या बहिणीकडे आले. त्यावेळी सहस्त्रबुद्धे क्लासेस या ठिकाणी शिपायाची नोकरी करुन त्यांनी शिक्षण घेतलं. (PTI)
-
किर्ती महाविद्यालयातून त्यांनी पदवीपर्यंतचं शिक्षण घेतलं. त्यानंतर मुंबई महापालिकेत क्लार्क म्हणून नोकरीही केली. (ANI)
-
वयाच्या २७ व्या वर्षी मनोहर जोशी ते एम. ए. एल. एल. बी झाले. त्यानंतर शिक्षक म्हणूनही कार्यरत होते. (ANI)
-
२ डिसेंबर १९६१ ला त्यांनी नोकरी सोडली आणि कोहिनूर क्लासेसमधून आपल्या व्यवसायाला सुरुवात केली. शिक्षणापासून वंचित युवकांना तांत्रिक शिक्षण देऊन स्वतःच्या पायावर उभं करण्याचा यामागचा त्यांचा उद्देश होता. (PTI)
-
१९६७ मध्ये ते बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांशी जोडले गेले आणि शिवसेनेत आले.
-
बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केल्यावर पहिल्या फळीतील शिवसैनिक म्हणून त्यांनी राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. (Express Archive)
-
मुख्यमंत्री असतांना जावयाला भूखंडाचा लाभ मिळवून देण्याचा कथित आरोप त्यांच्यावर झाले. त्यानंतर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी जोशी यांना चिठ्ठी पाठवत राजीनामा देण्यास सांगितले. (Express Archive)
-
तेव्हा तात्काळ आदेश मानत जोशी यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. ही नाट्यमय घटना त्यानंतर अनेक महिने चर्चेचा विषय ठरली होती. (ANI)
-
राडा करणाऱ्या शिवसैनिकांच्या गराड्यात मनोहर जोशी यांचा सभ्य आणि सुसंस्कृत चेहरा शिवसैनिक म्हणून मिळाला. त्यामुळेच त्यांच्याकडे महापौरपद आलं, मुख्यमंत्रीपद आलं, तसंच मानाची जवळपास सगळी पदं भुषवली. (Express Archive)
-
नगरसेवक (२ टर्म), विधानपरिषद सदस्य (३ टर्म), मुंबईचे महापौर (१९७६ ते १९७७), विधानसभा सदस्य (दोन टर्म्स), महाराष्ट्राचे मुख्यमंत्री – १९९५ ते १९९९ (PTI)
-
केंद्रीय अवजड उद्योग मंत्री (१९९९ ते २००२), लोकसभा अध्यक्ष (२००२ ते २००४), राज्यसभेचे खासदार (२००६ ते २०१२)
-
सुरुवातीला माधूकरी, त्यानंतर मुंबईतून येऊन शिकवणी वर्ग, ‘कोहिनूर’ची स्थापना, १९७६ ला मुंबईचे महापौर, मार्च १९९० ते डिसेंबर ९१ विधानसभेचे विरोधी पक्षनेते, मार्च १९९५ ते जानेवारी १९९९ या काळात राज्याचे मुख्यमंत्री, ऑक्टोबर ९९ ते मे २००२ केंद्रात वाजपेयी सरकारमध्ये केंद्रीय अवजड उद्योग मंत्री, मे २००२ ते ऑगस्ट २००४ लोकसभेचे अध्यक्ष असा त्यांचा चढता प्रवास राहिला आहे. (PTI)
-
नगरसेवक, महापौर, विधान परिषद आणि विधानसभेची आमदारकी, विरोधी पक्षनेते, मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री, लोकसभा अध्यक्ष अशी विविध पदे मनोहर जोशी यांनी भूषविली होती. प्रत्येक पदाला न्याय देण्याचा त्यांनी प्रयत्न केला. (Express Archive)
-
राजकारणात असतानाच क्रीडा क्षेत्रातही त्यांनी रस घेतला होता. मुंबई क्रिकेट असोसिएशन या संस्थेचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले होते. (PTI)
-
गेल्या वर्षी एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेत फूट पडली. मुख्यमंत्रीपद निवड झाल्यावर शिंदे यांनी मनोहर जोशी यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांचे आशीर्वाद घेतले होते. पण या वादात पडण्याचे टाळून जोशी सरांनी शेवटपयर्यंत ठाकरे घराण्याशी एकनीष्ठ राहण्यावर भर दिला.
-
शुक्रवारी दुपारी नंतर दादर स्मशान भूमीत मनोहर जोशी यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

बापरे! मुंबई लोकलच्या महिला डब्यात धक्कादायक प्रकार; पोलीस असूनही घडलं भयंकर, VIDEO पाहून धडकी भरेल