-
मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
-
फडणवीस मला संपवण्याचा विचार करत आहेत. माझं एन्काऊंटर करण्याचा त्यांचा विचार आहे. मला सलाईनमध्ये विष देण्याचा प्रयत्न केला जातोय, त्यामुळे मी परवापासून सलाईन घेणे बंद केले आहे, असे जरांगे म्हणाले आहेत.
-
जरांगे यांनी आज अंतरवाल सराटी येथे मराठा बांधवांशी बोलताना हे आरोप केले आहेत. मनोज जरांगे यांनी फडणवीसांवर नेमके काय आरोप केले, हे जाणून घेऊ या…
-
देवेंद्र फडणवीस कोण आहेत, हे मला तुम्हाला सांगायचे आहे. एक झालेल्य मराठ्यांशी ते काय करू पाहतायत हे मला तुम्हाला सांगायचे आहे. कारण मला ही माहिती फडणवीसांच्या जवळच्या लोकांनी सांगितली.
-
माझ्याविरोधात फडणवीस बदनामीचे षडयंत्र वापरतील. फडणवीसांमुळे अनेकांना भाजपा सोडण्याची वेळ आली.
-
ब्राह्मणी कावा मी माझ्याविरोधात चालू देणार नाही. मनोज जरांगे हे मराठ्याचं पोर आहे. हा ब्राह्मणी कावा जर नाही थांबवला तर मी माझं नाव बदलतो.
-
मी देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर पायी जाणार आहे. मी रस्त्यात मेलो तर मला फडणवीसांच्या सागर बंगल्यासमोर नेऊन टाका.
-
फडणवीसांनी काय आरोप करायचे ते करावे. पण मी मराठ्यांना सोडणार नाही. मला फडणवीस या नेत्यांच्या पंक्तीत बसवत आहेत. मी मरायला तयार आहे. फडणवीस हे मनोज जरांगेंच्या नादी लागले आहेत. मी शेतकऱ्यांचं पोरगं आहे.
-
मराठ्यांचा राज्यावर पुन्हा एकदा दरारा निर्णय झाला आहे. हा दरारा संपवण्याचा कट रचला जातोय.
-
हा दरारा मराठ्यांच्याच हाताने संपवण्याचे काम चालू आहे. यात एकनाथ शिंदे यांचे दोन-चार लोक आहेत.
-
सगेसोयऱ्यांची अंमलबजावणी केली जात नाहीये. १० टक्के आरक्षण मराठ्यांवर लादले जात आहे. मनोज जरांगे ऐकत नाही म्हणून त्याला संपवण्याचा प्रयत्न केला जातोय.
-
मनोज जरांगेला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातोय किंवा मनोज जरांगेला उपोषणात मरु द्यावे, यासाठी प्रयत्न केला जातोय.
-
मला सलाईनमधून विष देण्याचा प्रयत्न केला जातोय. त्यामुळेच मी परवा रात्रीपासून सलाईन बंद केले आहे. माझं एन्काउंटर करावं लागेल असं फडणवीसांना वाटतं.
-
देवेंद्र फडणवीस यांना एवढीच खुमखुमी आहे ना तर ही बैठक संपल्यावर मी सागर बंगल्यावर येतो. मला त्यांनी मारून दाखवावं. तुम्हाला माझा बळी घ्यायचा आहे का? मी सागर बंगल्यावर येतो.
-
माझा त्यांनी बळी घ्यावी. मी समाजाशी असलेली इमानदारी सोडू शकणार नाही. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण पाहिजे. आम्ही घेणारच. मी १० टक्के आरक्षणाला हात लावणार नाही.
-
मला बदनाम करण्यासाठी गेवराई तालुक्यातील २ आणि अंबड तालुक्यातील एकजण नारायण राणेंनी उचलून नेला आहे. त्यांच्या माध्यमातूनही आता पत्रकार परिषदा चालू होणार आहेत.
-
देवेंद्र फडणवीस जर असं करू नको म्हणाले तर नारायण राणेंची असं काही करण्याची हिंमत नाही.
-
हे सर्वकाही देवेंद्र फडणवीस यांचं षडयंत्र आहे. फडणवीस म्हणाले तर एका मनिटात सगेसोयऱ्यांची अंमलबजावणी होईल.

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”