-
मनोज जरांगे पाटील म्हणाले महाराष्ट्र बेचिराख झाला असता. ही कसली भाषा? याची योजना कुणाची होती? हा प्रश्न आहे – आशिष शेलार
-
काहीतरी गंभीर कट रचला जाणार असल्याची भाषा मनोज जरांगे पाटील यांची होती – आशिष शेलार
-
महाराष्ट्र बेचिराख करण्याची योजना ठरली होती का? न्यायालयानेही हा विषय गांभीर्यानं घेण्याची भूमिका व्यक्त केली आहे – आशिष शेलार
-
तुम्हाला निपटून टाकू अशी भाषा मनोज जरांगे पाटलांनी देवेंद्र फडणवीसांबाबत केली – आशिष शेलार
-
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्र्यांना, भुजबळांना धमकी देण्याची हिंमत कुठून आली? – आशिष शेलार
-
आदल्या दिवशी विरोधकांचे पत्रकार पोपटलाल म्हणाले एका दिवसात भाजपाला संपवू. दुसऱ्या दिवशी मनोज जरांगे पाटील संपवण्याची भाषा करतात. यात कट कारस्थान होतं का?- आशिष शेलार
-
मनोज जरांगे पाटील म्हणतात, पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा आम्ही उधळून टाकू? असं म्हणणारे कोण तुम्ही? – आशिष शेलार
-
मनोज जरांगे पाटील कुठे राहतात हे शोधलं पाहिजे. तो कारखाना कुणाचा आहे हे पाहिलं पाहिजे. तिथे आलेली दगडं, जेसीबी कुणाच्या कारखान्यातून आले? – आशिष शेलार
-
यामागे राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका असेल, तर या प्रकरणाचा तपास करण्यासाठी एसआयटी लावली जावी – आशिष शेलार
-
काही लोक रोज ती स्क्रिप्ट बोलतात. तीच स्क्रिप्ट मनोज जरांगे पाटलांकडून येत आहे. संभाजीनगर, नवी मुंबई, पुण्याला वॉररूम कुणी उघडली याची माहिती आहे आमच्याकडे – देवेंद्र फडणवीस
-
अशाप्रकारे कुणी कुणीची आई-बहीण काढणार असेल, तर या सभागृहाकडून अपेक्षा अशी आहे की त्यांनी संबंधित सदस्याच्या पाठिशी उभं राहायला हवं – देवेंद्र फडणवीस
-
आता हे षडयंत्र बाहेर येत आहे. कशाप्रकारे रात्री जाऊन मनोज जरांगेंना परत आणणारे कोण आहेत? त्यांच्या घरी जाऊन त्यांना भेटणारे कोण आहेत? कुणाकडे बैठक झाली ते आरोपीच सांगत आहेत. दगडफेक करा असं सांगितल्याचं आरोपीच सांगत आहेत – देवेंद्र फडणवीस
-
दगडफेक करण्यासाठी ट्रॅक्टरमधून दगडं आणण्यात आली. यासंदर्भात अटकेतील आरोपी हे सांगतोय. त्याची चौकशी व्हायला हवी – प्रविण दरेकर
-
बारस्कर, संगीता वानखेडे यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. हा कट करणाऱ्यांची एसआयटी चौकशी केली पाहिजे – प्रविण दरेकर
-
नारायण राणेंनी कानाखाली मारली असती म्हटलं, तर त्यांना तुरुंगात टाकलं. मग राज्यात सगळ्यांना समान न्याय पाहिजे. जर जरांगे उपमुख्यमंत्र्यांबाबत अश्लाघ्य वक्तव्य करत असेल, तर जरांगेंची चौकशी करून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला पाहिजे. त्यांना अटक केली पाहिजे – प्रविण दरेकर
-
जेसीबींनी फुलं उधळली गेली. लाखोंच्या सभा झाल्या. या सभांना, जेसीबींना पैसे कुणी दिले? याची चौकशी व्हायला हवी – प्रविण दरेकर
-
संगीता वानखेडेंनी जरांगेंवर आरोप केले आहेत. बारस्कर महाराजांनी सांगितलं तेच बरोबर आहे, जरांगे कुणालाच विश्वासात घेत नव्हते. फक्त एक फोन घेत होते. तो फोन शरद पवारांचाच होता, असा आरोप संगीता वानखेडेंनी केला आहे – प्रविण दरेकर
-
‘शरद पवार मनोज जरांगेंना फोन करत होते. आंदोलनाचा सगळा खर्च शरद पवारांनी केला आहे. मनोज जरांगेंचे बॅनर राष्ट्रवादी काँग्रेसनं लावले. शरद पवार जसं सांगतात, तसंच मनोज जरांगे करतात. आरक्षणाचे मारेकरी शरद पवार आहेत’, असा आरोप संगीाता वानखेडेंनी केला आहे – प्रविण दरेकर
-
‘राजेश टोपेंच्या कारखान्यावर या सगळ्या प्रकाराचं षडयंत्र रचलं गेलं’, असा दावाही संगीता वानखेडेंनी केला आहे – प्रविण दरेकर
-
मनोज जरांगे पाटलांच्या मागण्या वारंवार बदलत गेल्या – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
-
सरकार म्हणून आम्ही निर्णय घेतला. पण देवेंद्र फडणवीसांवर अगदी खालच्या पातळीवर जाऊन आरोप केले. ही कार्यकर्त्याची भाषा नसून राजकीय भाषा आहे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
-
कायद्याच्या चौकटीत न बसणाऱ्या गोष्टींची मागणी करणं हे बरोबर आहे का? – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
-
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाविषयी विधानपरिषदेत भूमिका मांडली.

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”