-
अथक प्रयत्न-संघर्ष आणि १०८ हुतात्म्यांच्या आहुतीनंतर १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना होऊन मुंबई ही राज्याची राजधानी बनली. महाराष्ट्र राज्यामध्ये मराठी भाषिक बहुसंख्य असले, तरी मराठी भाषेला राजभाषा होण्यासाठी काही कालावधी जावा लागला. बरेचसे साहित्यिक, पत्रकार, क्रांतिकारक यांनी दिलेल्या लढ्यामुळे मराठीला राजभाषेचा दर्जा मिळाला.
-
मराठी भाषा ही महाराष्ट्रासह अनेक देशांमध्ये बोलली जाते. जगभरातील सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषांमध्ये मराठीचा समावेश आहे. मराठी साहित्याची मोठी व्याप्ती आहे. अनेक दिग्गज कवी, लेखक यांनी मराठी भाषेमध्ये उत्तमोत्तम कलाकृतींची निर्मिती केली आहे. असेच एक ज्येष्ठ साहित्यिक म्हणजे कुसुमाग्रज ऊर्फ विष्णू वामन शिरवाडकर.
-
देशपातळीवर मराठीचा झेंडा फडकवण्यासाठी त्यांनी खूप काम केले होते. त्यांनी केलेल्या संघर्षांला आणि त्यांच्या दर्जेदार कलाकृतींना अभिवादन करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने त्यांच्या जन्मदिवशी म्हणजेच ‘२७ फेब्रुवारी’ रोजी ‘मराठी भाषा दिन’ साजरा करण्याचा निर्णय घेतला. २०१३ मध्ये याबाबतची अधिकृत घोषणा करण्यात आली.
-
मराठी भाषेबद्दल अनेक संत, साहित्यिकांनी खूप काही लिहून ठेवले आहे. मातृभाषेची तुलना अमृताशी करताना संत ज्ञानेश्वरांनी यांनी ‘माझा मराठीची बोलू कौतुके। परि अमृतातेहि पैजासी जिंके’ असे म्हटले आहे.
-
अशाचप्रकारे, कुसुमाग्रजांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने मुंबई नाशिक महामार्गाच्या टोलनाक्यावर त्यांच्या कवितांच्या काही ओळी त्यांचे पवित्र स्मरण करून देतात.
-
“जाता जाता गाईन मी, गाता गाता जाईन मी. गेल्यावरही या गमनातील गीतांमधुनी राहीन मी.” – कुसुमाग्रज
-
“लपे ढगामागे धावे माळावर, असा खेळकर श्रावण आला. सृष्टीत सुखाची करीत पेरणी, आनंदाचा धनी श्रावण आला.” – कुसुमाग्रज
-
“आद्याप विराणी कुणी वाऱ्यावर मात, वेडात मराठे वीर दौडले सात” – कुसुमाग्रज
-
“आवडतो मज अफाट सागर, अथांग पाणी निळे. निळ्याजांभळ्या जळात केशर सायंकाळी मिळे.” – कुसुमाग्रज
-
“माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा. हिच्या संगाने जागल्या, दऱ्याखोऱ्यातील शिळा.” – कुसुमाग्रज
![famous actress Parvati Nair got engaged to businessman Aashrith Ashok](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/famous-actress-Parvati-Nair-got-engaged-to-businessman-Aashrith-Ashok.jpg)
प्रसिद्ध अभिनेत्रीने बिझनेसमनशी केला साखरपुडा, आजपासून लग्नाआधीच्या सेलिब्रेशनला सुरुवात, ‘या’ शहरात होणार लग्न