-
भाजपाने शनिवारी (२ मार्च) १६ राज्यातील १९५ लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. या यादीत चार भोजपुरी कलाकारांचा समावेश करण्यात आला होता.
-
रवीकिशन, मनोज तिवारी आणि दिनेश लाल यादव निरहुआ यांना पुन्हा एकदा उमेदवारी दिली आहे. तर यावेळी पवन सिंह यांना पश्चिम बंगालच्या आसनसोल मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली.
-
हिंदी पट्ट्यात विजय मिळवण्यासाठी मागच्या निवडणुकीपासून भोजपुरी कलाकारांना निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्याचा पायंडा भाजपाने पाडला.
-
मात्र यावेळी भाजपाच्या मनसुब्याला भोजपुरी गायक आणि अभिनेते पवन सिंह यांनी हरताळ फासला आहे. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी आपण निवडणूक लढणार नसल्याचे पवन सिंह यांनी जाहीर करून टाकले आहे.
-
पवन सिंह यांना आसनसोल मतदारसंघासाठी उमेदवारी दिली होती. याठिकाणी तृणमूल काँग्रेसकडून शत्रुघ्न सिन्हा खासदार आहेत. पनव सिंह आणि सिन्हा दोघेही मुळचे बिहारचे आहेत.
-
दिनेश लाल निरहुआ हेदेखील गायक आणि अभिनेते असून त्यांना उत्तर प्रदेशच्या आझमगड मतदारसंघातून दुसऱ्यांदा उमेदवारी मिळाली आहे.
-
रविकिशन हे भोजपुरी आणि बॉलिवूडमधील गाजलेले कलाकार आहेत. त्यांना गोरखपूर लोकसभा मतदारसंघातून पुन्हा उमेदवारी मिळाली आहे. उत्तर प्रदेशमधील वाराणसी या मतदारसंघानंतर गोरखपूर हादेखील महत्त्वाचा मतदारसंघ आहे.
-
रविकिशन हे भोजपुरी आणि बॉलिवूडमधील गाजलेले कलाकार आहेत. त्यांना गोरखपूर लोकसभा मतदारसंघातून पुन्हा उमेदवारी मिळाली आहे. उत्तर प्रदेशमधील वाराणसी या मतदारसंघानंतर गोरखपूर हादेखील महत्त्वाचा मतदारसंघ आहे.
-
या चार भोजपुरी अभिनेते, गायकांसह ज्येष्ठ अभिनेत्री हेमा मालिनी यांना पुन्हा एकदा उत्तर प्रदेशच्या मथुरा लोकसभेसाठी तिकीट देण्यात आले आहे.

‘उनसे मिली नजर’, गाण्यावर विद्यार्थिनींचा शिक्षकाबरोबर जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कमेंट्स