-
गद्दारांनी केलेल्या गद्दारीमुळे महाराष्ट्राच्या सुसंस्कृत राजकारणाच्या संस्कृतीला कलंक लागला. हा कलंक पुसण्यासाठी सज्ज झालेल्या जनसमुदायाच्या ताकदीची प्रचिती धाराशिव लोकसभेतील कळंब येथे झालेल्या जनसंवाद मेळाव्यात आली, असल्याचे उद्धव ठाकरेंनी सांगितले.
-
“ही लढाई आता… वाघ विरुद्ध लांडगे, इमानदार विरुद्ध बेईमानदार, निष्ठावंत विरुद्ध गद्दार अशी आहे”, असे सुतोवाच उद्धव ठाकरे यांनी केले.
-
महाराष्ट्रातल्या भाजपच्या खासदारांनी कधीतरी मोदींसमोर संसदेत महाराष्ट्रातील जनतेच्या हिताचे प्रश्न मांडले का? असा प्रश्न उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला.
-
उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, देशातली सगळी राज्य समृद्ध झाली पाहिजेत, तरच भारतमाता की जय आपण बोलू शकतो. ह्याची जाणीव आम्हाला आहे. पण तुमच्या मनात महाराष्ट्रद्वेष का?
-
न्यायदानामध्येही भाजपची काळी मांजरं बसली असतील, तर आम्ही न्याय मागायचा कुणाकडे? असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
-
उबाठा गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनीही जनसंवाद मेळाव्यातून भाजपावर तोफ डागली.
-
माझे वडील पवनराजे निंबाळकर यांची हत्या झाली तेव्हा बाळासाहेब ठाकरेंनी मला पदरात घेतलं. त्यावेळी बाळासाहेब म्हणाले होते पद्मसिंह वगैरे काहीही सांगू नको, उद्धव याच्याकडे लक्ष दे. तुम्ही त्याप्रमाणे कायमच माझ्याबद्दल आपुलकी आणि आपलेपणा दाखवलात. मी हे उपकार कधीच विसरणार नाही, असे खासदार ओमराजे निंबाळकर एका सभेत म्हणाले.
-
धाराशिव-कळंब विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि उबाठा गटाचे नेते कैलास पाटील यांच्या कळंब मतदारसंघातही जाहीर सभा पार पाडली. या सभेत कैलास पाटील यांनी उबाठा गटात का राहिलो? याबद्दलची भूमिका मांडली.
-
धाराशिव येथील तुळाजापूर शहरात झालेल्या सभेत उद्धव ठाकरे यांनी तुळजाभवानीची शपथ घेऊन पुन्हा एकदा मातोश्रीवरील बैठकीचा उल्लेख केला. त्या बैठकीत अमित शाह यांनी बंद दाराआड अडीच वर्ष मुख्यमंत्री पद देण्याचा शब्द दिला होता, असे त्यांनी पुन्हा एकदा सांगितले.

‘एमपीएससी’ची राज्यसेवा मुख्य परीक्षा पुढे ढकलण्यासंदर्भात मोठा निर्णय… एमपीएससीच्या बैठकीत ठरले की….