-
राजस्थानमधील पोखरण येथे आज भारताच्या तीनही सैन्यदलाने ‘भारत शक्ती’ या कार्यक्रमात युद्धसराव केला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, मागच्या दहा वर्षांत देशाला संरक्षण क्षेत्रात आपण आत्मनिर्भर बनविले आहे.
-
मंगळवारी (दि. १२ मार्च) राजस्थानच्या पोखरण येथे ३० हून अधिक देशातील प्रतिनिधींच्या सहकार्याने युद्धाभ्यास केला गेला. “भारत शक्ती” या नावाने झालेल्या युद्ध सरावाला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित होते.
-
स्वदेशी शस्त्रास्त्रांची मारक क्षमता आणि तीनही सशस्त्र दलांमधील समन्वयाचा परिचय या सरावातून करून देण्यात आला.
-
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, आज पोखरणची भूमी पुन्हा एकदा भारताची आत्मनिर्भरता, भारताचा आत्मविश्वास आणि भारताच्या आत्मगौरवाची त्रिवेणी साक्षीदार बनली आहे.
-
पोखरणची हीच भूमी भारताच्या आण्विक शक्तीची साक्षीदार राहिलेली आहे, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.
-
पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले, आज पोखरणच्या या भूमीत स्वदेशीकरणातून सशक्तीकरणाचा प्रवास पोखरणमध्ये दिसून आला.
-
“मागच्या दहा वर्षांत संरक्षण क्षेत्रात भारताला आत्मनिर्भर बनविण्यासाठी आम्ही अथक प्रयत्न केले. एमएसएमई आणि स्टार्टअपना यासाठी प्रोत्साहीत केले गेले.”
-
“आगामी काळात जेव्हा भारत जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था बनेल तेव्हा भारताचे लष्करी सामर्थ्य एका नव्या शिखरावर असेल.”
-
भारताच्या संरक्षण क्षेत्राबद्दल बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले, भविष्यकाळात भारताचे लष्करीसामर्थ्य खूप वाढणार असून यातून रोजगार आणि स्वंयरोजगार निर्माण होणार आहेत.
-
भारत एकेकाळी संरक्षण क्षेत्रासाठी आयात करत होता. आता भारता शस्त्र आणि इतर साधनांची निर्यात करत आहे. २०१४ च्या तुलनेत आता आपली निर्यात आठ पटींनी वाढल्याचे त्यांनी सांगितले.
-
पंतप्रधान मोदी म्हणाले, मागच्या १० वर्षात भारताने आपले लढाऊ विमान बनविले आहे. तसेच स्वतःचे एअरक्राफ्टही बनविले आहे. आज उत्तर प्रदेश आणि तमिळनाडू राज्य भारताचे डिफेन्स कॉरीडोर बनत आहेत. या दोन्ही राज्यात ७ हजार कोटींहून अधिकची गुंतवणूक झाली आहे, असेही त्यांनी सांगितले.
-
हेलिकॉप्टर बनविणारी आशियातील सर्वात मोठी कंपनी भारतात आहे, असेही ते म्हणाले.

शनीदेव घेऊन आले सुखाचे दिवस; मकर राशीची साडेसाती संपताच ‘या’ तीन राशींना गडगंज श्रीमंतीचे सुख लाभणार