-
मणिपूरहून निघालेल्या राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो न्याय यात्रे’चा आज, रविवारी शिवाजी पार्कवरील जाहीर सभेने समारोप होणार आहे. मात्र या सभेआधीच इंडिया आघाडीचे सर्व बॅनर्स शिवाजी पार्क परिसरातून हटविण्यात आले.
-
मणिपूरमधून निघालेली राहुल गांधी यांची यात्रा दोन महिन्यानंतर सुमारे ६७०० किमी प्रवास करून दादर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चैत्यभूमी या स्मारकस्थळी शनिवारी दाखल झाली.
-
राहुल यांचे मुंबईत जोरदार स्वागत करण्यात आले. धारावीत झालेल्या सभेला प्रियंका गांधी, राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत आदी उपस्थित होते. राहुल गांधी यांनी आज रविवारी मणिभवन ते ऑगस्ट क्रांती मैदान अशी पदयात्रा काढली.
-
शिवाजी पार्कवरील सभेच्या माध्यमातून काँग्रेस आणि इंडिया आघाडीच्या प्रचाराची सुरुवात केली जाईल. या सभेसाठी ‘इंडिया’ आघाडीच्या नेत्यांना निमंत्रित करण्यात आले आहे.
-
पण काल (दि. १६ मार्च) निवडणूक आयोगाने आचारसंहिता लागू केल्यानंतर सर्व देशात राजकीय पक्षांचे बॅनर हटविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.
-
राहुल गांधी यांच्या सभेच्या निमित्ताने इंडिया आघाडीच्या पक्षांनी बॅनरबाजी केली होती. मात्र आचारसंहितेमुळे सर्व बॅनर हटविण्यात आले.
-
मध्यरात्री मनपाच्या पथकाने सर्व बॅनर फाडून टाकले.
-
२० एप्रिल पासून लोकसभा निवडणुकीला सुरुवात होत आहे. देशात सात टप्प्यात तर महाराष्ट्रात पाच टप्प्यात निवडणूक संपन्न होईल.
-
इंडिया आघाडीच्या शिवाजी पार्कवरील सभेतून लोकसभा निवडणुकीचे रणशिंगे फुंकले जाणार आहे.

होळीनंतर या तीन राशींचे चमकणार सोन्यासारखे नशीब, बँक बॅलेन्समध्ये वाढणार, मिळेल अपार पैसा संपत्ती