-
भारतीय नौदलाच्या समुद्री चाचे विरोधी मोहिमेत ३५ समुद्री चाच्यांना १६ मार्च रोजी जेरबंद करण्यात आले होते. आज INS कोलकाता या समुद्री चाच्यांना घेऊन मुंबई येथे पोहोचली.
-
एएनआयने दिलेल्या माहितीनुसार, सीमा शुल्क आणि इतर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर सोमालियाच्या या २५ समुद्री चाच्यांना नौदलाने मुंबई पोलिसांच्या ताब्यात दिले.
-
भारतीय नौदलाने अरबी समुद्रात अँटी पायरसी मोहीम राबविली होती. यावेळी एका व्यापारी जहाजावर कब्जा करणाऱ्या ३५ समुद्री चाच्यांना आत्मसमर्पण करण्यास भाग पाडले.
-
१५ मार्च रोजी नौदलाची ही थरारक मोहीम पार पडली होती. अरबी समुद्रात एमवी रुवन (ex-MV Ruen) या जहाजाचा वापर करून समुद्री चाचे व्यापारी जहाजांवर कब्जा करत होते. नौदलाने या जहाजावर करडी नजर ठेवून त्यावर हल्ला केला.
-
सोमालियाच्या समुद्री चाच्यांना भारतीय नौदलाची चाहूल लागल्यानंतर त्यांनी सोमालियाच्या किनाऱ्याच्या दिशेने पळ काढला. तसेच भारतीय युद्धनौकेवर गोळीबारही केला.
-
समुद्री चाच्यांच्या या गोळीबारास चोख प्रत्युत्तर देत नौदलाने चाच्यांना शरणागती पत्करण्यास भाग पाडले.
-
नौदलाने दिलेल्या माहितीनुसार ‘ऑपरेशन संकल्प’ या मोहिमेअंतर्गत भारतीय नौदलाने अरबी समुद्र आणि एदनच्या आखातामध्ये व्यापारी जहाजांना सुरक्षित मार्ग मिळावा, यासाठी समुद्री चाचे विरोधी मोहीम हाती घेतली आहे.
-
सोमालियाच्या समुद्री चाच्यांना मुंबई पोलिसांच्या ताब्यात दिल्यानंतर त्यांच्यावर आता “सागरी चाचेगिरी विरोधी कायदा, २०२२” (Maritime Anti Piracy Act) अंतर्गत कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.
-
यावर्षी जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात भारतीय नौदलाने अरबी समुद्रातील चाचेगिरी मोडून काढण्याचा संकल्प हाती घेतलेला आहे. याआधीही समुद्री चाच्यांवर कारवाई करत इराणी आणि पाकिस्तानी नागरिकांची चाच्यांच्या हातून सुटका केली होती.
६ फेब्रुवारी राशिभविष्य: सूर्याच्या नक्षत्र परिवर्तनाने मेष, सिंहच्या कुंडलीत होणार मोठे बदल; पंचांगानुसार तुमच्या राशीचे भाग्य कसे उजळणार?